आगामी पाच वर्षांत अक्कलकोटचा कायापालट करू : कल्याणशेट्टी
अक्कलकोट, ( कटूसत्य वृत्त ):-
तालुक्याचा एक मॉडेल म्हणून विकास होण्यासाठी सर्व कामे मंजूर झाली आहेत. आता या कामांना चालना देण्यासाठी आणि विकासाचे चक्र पुढे सुरू ठेवण्यासाठी महायुतीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे तालुक्यातील जनतेने भूलथापांना बळी न पडता भाजपच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रचारार्थ वागदरी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. कल्याणशेट्टी म्हणाले, वागदरी भाग नेहमीच भाजपच्या पाठीशी राहिला आहे. यावेळीसुध्दा तो राहील याबद्दल मला विश्वास आहे. या भागातील विकासाचा अनुशेष आपण भरून काढू.
माजी जि. प. सदस्य आनंद तानवडे म्हणाले, कुठल्याही अफवा अथवा भूलथापांना बळी न पडता एकदिलाने सर्वांनी भाजपला निवडून आणावे. गेल्या पाच वर्षांत कल्याणशेट्टी यांनी तालुक्याचा चौफेर विकास केला आहे. .
अप्पू बिराजदार म्हणाले, राज्यात पुन्हा एकदा भाजप महायुतीचे सरकार आणण्यासाठी कमळ या चिन्हासमोरील बटण दाबून भाजप महायुतीला प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी संजय देशमुख, दिलीप सिध्दे, अविनाश मडिखांबे, शिवराज स्वामी, मल्लिनाथ स्वामी, महेश हिंडोळे, राजेंद्र बंदीछोडे, शरणप्पा मंगाणे, धोंडप्पा यमाजी, सागर कल्याणशेट्टी, अमोल हिप्परगी आदी उपस्थित होते.
0 Comments