स्वतःचे दुःख बाजूला ठेवून लोकसेवा करणाऱ्यास संधी द्या: पाटील
अक्कलकोट ( कटूसत्य वृत्त ):-
धर्मपत्नी व पित्याचे छत्र हरपल्याचे दु:ख बाजूला सारून सर्वसामान्यांच्या कार्यासाठी सदैव झटणारे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सिध्दाराम म्हेत्रे यांना विजयी करून विधानसभेत पाठवा, असे आवाहन आळंदचे आमदार बी. आर. पाटील यांनी केले.
चपळगाव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार सिध्दाराम म्हेत्रे यांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेत ते बोलत होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पांडुरंग चव्हाण होते. पाटील म्हणाले, अक्कलकोट तालुक्याचा विकास सिध्दाराम म्हेत्रे यांच्या दूरदृष्टीमुळे झाला आहे. म्हेत्रे यांनी केलेली कामे आजही दर्जेदार आहेत. त्याचा उपयोग लोकांना होत आहे. यावेळी राज्यात महाविकास आघाडीला चांगले वातावरण आहे. सिध्दाराम म्हेत्रे हे अक्कलकोट तालुक्याचे नेतृत्व करतील आणि विजयी होऊन ते मंत्री होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बसवराज बाणेगाव, सिध्दाराम भंडारकवठे यांनीही म्हेत्रे यांच्या कार्याबाबत उपस्थितांना माहिती देत त्यांना निवडून आणण्याचे आवाहन केले. या सभेला सिध्दार्थ गायकवाड, विश्वनाथ भरमशेट्टी, सुनील बिराजदार,= सिध्दाराम भंडारकवठे, बसवराज बाणेगाव, अबुजर पटेल, शाकीर पटेल, मज्जू चौधरी, मल्लिनाथ माळगे यांच्यासह महाविकास आघाडी व काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments