Hot Posts

6/recent/ticker-posts

देवेंद्र फडणवीसांवर केस करणार; सुप्रीया सुळेंचा

 देवेंद्र फडणवीसांवर केस करणार; सुप्रीया सुळेंचा 



 पुणे ( कटूसत्य वृत्त ):-  देवेंद्र फडणवीस यांनी फाईल का दाखवली? आपण देवेंद्र फडणवीस यांच्यावर केस करणार, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी केलं आहे.


निवडणूक संपण्याची वाट पाहते आहे, त्यानंतर केस करणार असल्याचा इशाराही खासदार सुप्रीया सुळे यांनी दिला आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणीही सुप्रीया सुळे यांनी केली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रीया सुळे म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यांनी अजित पवार यांना फाईल दाखवल्याचं अजित पवार स्वतः भाषणात म्हणाले. उपमुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांना फाईल दाखवलीच कशी? आपण देवेंद्र फडणवीस यांच्यावर केस करणार, निवडणूक संपण्याची वाट पाहते आहे.त्यानंतर केस करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रीया सुळे यांनी दिला आहे. असं केलं असेल तर, देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागण्याची देखील मागणी सुप्रीया सुळे यांनी केली आहे.


"फडणवीसांना राज्याला उत्तर द्यावंच लागेल, कारण देवेंद्र फडणवीस यांना, ऑन ओथ जेव्हा आपण शपथ घेतो आणि राज्याचे मुखमंत्री असतो, फाईल्स कोणाला दाखवण्याचा अधिकार नाही. ज्या व्यक्तीवर आपण केस करतो, त्या व्यक्तीला आपण बोलवून आपण फाईल दाखवतो हे योग्य आहे? हा संविधानाचा अपमान आहे. आणि म्हणून आमचं सगळ्याचं म्हणणं आहे की, याचं उत्तर स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे, त्यांनी फाईल कशी दाखवली आणि का दाखवली?", असं देखील सुप्रीया सुळे म्हणाल्या आहेत.


दरम्यान, यापूर्वीही सुप्रीया सुळे यांनी 'त्या' फाईल प्रकरणावरुन थेट इशारा दिला होता. सुप्रीया सुळे म्हणालेल्या की, "देवेंद्र फडणवीसांनी राज्याला फसवलंय. ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच घरी बोलवून घेतलं, एकतर फाईल घरी आणलीच कशी? आणली तर ज्यांच्यावर आरोप केले त्यांना दाखवली कशी? याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. सुनेत्रा पवार यांचंही नाव गोवले गेलं, त्यांचं नाव आणायची काय गरज होती? माझा या सरकारवर आरोप आहे की, ते महिलांनाही यात अडकवत आहेत."

Reactions

Post a Comment

0 Comments