७०० कोटींपेक्षा जास्त विकासकामांना मंजुरी मिळवली आ. सुभाष देशमुख
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आपल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात शहरी हद्दवाढ भागात सर्व प्रकारच्या नागरी सुविधा निर्माण करत सुनियोजित विकास केला. ७०० कोटींपेक्षा जास्त विकासकामांना मंजुरी मिळवली आहे. यातील काही कामे पुढील काळात पूर्ण होतील, असे प्रतिपादन महायुतीचे भाजपचे उमेदवार आ. सुभाष देशमुख यांनी केले. १२५ कोटींच्या निधीमधून अंतर्गत डांबरी व काँक्रीटचे रस्ते बनवले. अमृत योजनेंतर्गत १६५ कोटी रुपयाच्या निधीतून भूमिगत गटारे बनवली. सुवर्ण जयंती नगरोथान अंतर्गत ४२९ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळावली, आसरा ते जुळे सोलापूरला जोडणाऱ्या रेल्वे पूल विस्तारासाठी २८.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे.अशाप्रकारे गेल्या दहा वर्षांत मी जनतेचा सेवक म्हणून केले आहे आणि यापुढेही करणार आहे, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ.देशमुख यांनी शहर भागातील जुळे सोलापूर, डीसीसी बँक कॉलनी, देगाव परिसरातील नागरिकांशी संवाद
साधला त्यावेळी ते बोलत होते.यावेळी नागरिकांनी आ. देशमुख यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले. आ. देशमुख पुढे म्हणाले की,हद्दवाढ भागातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी १२.५० कोटी रुपयांची कामे केली आहेत. २०१९ मध्ये जनतेने युतीला कौल दिला होता. पण वैयक्तिक स्वार्थासाठी उद्धव ठाकरे यांनी जनतेचा घात केला. अडीच वर्षांमध्ये फक्त त्यांनी लोक,कल्याणाच्या अनेक योजना रद्द केल्या,याचा फटका आपल्या मतदार संघालाही बसला आहे.यावेळी भाजप सरचिटणीस विशाल गायकवाड, आनंद बिराजदार,महेश देवकर, अमोल गायकवाड,शिलरत्न गायकवाड, डॉ. शिवराज सरतापे, हेमंत पिंगळे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments