माढ्यात शिंदे गटाला मोठा धक्का
संजय कोकाटे व भारत शिंदे यांचा अभिजीत पाटील यांना पाठिंबा
लऊळ (कटूसत्य वृत्त):-संपूर्ण राज्यभरामध्ये विधानसभा निवडणुकांचा धुरळा उडलेला असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी चिन्हाला मोठी पसंती असल्याचे पाहायला मिळत आहे. माढा मतदारसंघातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी या चिन्हाला मतदारांची मोठी पसंती असून या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांना रोज अनेक दिग्गज नेत्यांकडून पाठिंबा दिला जात आहे. तसेच त्यांच्या सभांनाही मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. माढा मतदारसंघांमध्ये अभिजीत पाटील यांनी प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली असून बबनराव शिंदे यांच्या यांचे पुत्र रणजीत शिंदे यांना प्रचारात पिछाडीवर सोडले आहे. अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित अरण येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय कोकाटे व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भारत शिंदे यांनी अभिजीत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. संजय कोकाटे यांनी गत पंचवार्षिक निवडणुकी बबनराव शिंदे यांचे प्रमुख विरोधक म्हणून त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.
गेल्या आठ दिवसांपासून अभिजीत पाटील यांना अनेक गटांचा पाठिंबा मिळाला असल्याचे दिसत आहे. निवडणुकांमध्ये आमदार बबनराव शिंदे यांना सहकार्य करणाऱ्या अनेक जणांनी यंदा परिवर्तनाचा निर्धार करत अभिजीत पाटील यांना पाठिंबा दिल्याने आमदार बबनराव शिंदे यांच्या गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. अशातच तसेच शेवट पर्यंत प्रयत्न करूनही तुतारी चिन्ह न मिळाल्याने अपक्ष लढण्याची नामुष्की ओढावलेल्या पुत्र रणजीत शिंदे यांच्यासाठी हा फार मोठा धक्का मानला जात असून यामुळे अभिजीत पाटील यांचा विजय सोपा मानला जात आहे..
यावेळी भारत शिंदे यांनी आपण रणजीतसिह शिंदे यांच्याबरोबर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये काम केले असून त्यांची आमदार होण्याची पात्रता नाही हे आम्ही जाणून आहोत. याबाबत तालुक्यातील वातावरण लक्ष्यात घेऊन बबनदादांनाही समजावण्याचा प्रयत्न करून त्यांना स्वतः उभा राहण्याचा आग्रह केला. पण त्यांनीही आपल्या मुलासच उमेदवारी दिली. दुसरीकडे अभिजित पाटील हे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व असून त्यांनी बंद पडलेला विठ्ठल कारखाना चालू करून विक्रमी गळीत करून दाखवले आहे. त्यामुळे एकीकडे वडिलांच्या कष्टातून उभारलेल्या संस्था मोडीत काढणारा उमेदवार आणि दुसरीकडे बंद पडलेल्या संस्था चालवून दाखवणारा उमेदवार असल्याने आम्ही तालुक्यातील सहकाऱ्यांनी एकत्रित येत अभिजित पाटील यांना साथ देण्याचा निर्णय घेतल्याचे भारत शिंदे यांनी सांगितले. या निमित्ताने पुन्हा एकदा जिल्ह्याचे नेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याजवळ बसण्याची संधी मिळाल्याने समाधान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. गतवेळचे उमेदवार संजय कोकाटे यांनीही माढा तालुक्यातील ७८ गावांची जबाबदारी घेत अभिजित पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून केवळ उसाचे राजकारण करणाऱ्या आणि गेल्या तीस वर्षात दडपशाहीचे राजकारण करणाऱ्यांना दूर ठेवण्याससाठी आम्ही बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. यावेळी अभिजीत पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, यांच्यासह माढा तालुक्यातील अनेक नेत्यांची भाषणे झाली. सुमारे अडीच तास चाललेल्या सभेस लोकांनी विक्रमी गर्दी केली होती. सूत्रसंचालन हरिदास रणदिवे यांनी केले.
माढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पाटील यांना नेते आणि जनतेचा पाठिंबा वाढत असून रविवारी अरण येथे झालेल्या प्रचार सभेप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य भारत आबा शिंदे आणि गतवेळचे विधानसभेचे उमेदवार संजय कोकाटे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह जाहीर पाठिंबा दिला. हा अपक्ष उमेदवार रणजितसिंह शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते - पाटील, खासदार धैर्यशील मोहिते - पाटील, ज्योती कुलकर्णी, भारतनाना पाटील, बाळासाहेब पाटील, राजाभाऊ गायकवाड, अनिल पाटील, मधुकर देशमुख, बाबूतात्या सुर्वे, रामकाका म्हस्के, पोपट अनपट, रावसाहेब देशमुख, बाळासाहेब ढवळे, बलभीम लोंढे, अमोल पाटील, प्रशांत पाटील, हरिदास रणदिवे, संजय मस्के, विलास देशमुख, गोविंदभाई देशमुख, ऋषिकेश बोबडे, दीपक देशमुख, आनंद कानडे, विजय भगत, विजय पवार, सौदागर जाधव, प्रमोद कुटे, बेंबळे गावचे सरपंच सौदागर जाधव, बालाजी आवारे, रणजित बागल, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
0 Comments