Hot Posts

6/recent/ticker-posts

तर शरद पवार यांनी तुम्हाला मंत्री केले असते : खा. धैर्यशील

 तर शरद पवार यांनी तुम्हाला मंत्री केले असते : खा. धैर्यशील




माढा (कटूसत्य वृत्त):- सीना-माढा योजना ही शरद पवारांनी दिली असून या योजनेसाठी मंत्रीपद सोडले ही खोटे बोलण्याची सवय आता बंद करावी. आपण खरच पात्र असता तर आतापर्यंत शरद पवार यांनी तुम्हाला मंत्री केले असते, अशी खरमरीत टीका खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी आमदार बबनराव शिंदे यांच्यावर अरण (ता. माढा) येथील मेळाव्यात केली.

माजी जि.प. सदस्य भारत शिंदे व संजय कोकाटे यांच्या पाठिंब्याच्या मोळाव्यात  ते बोलत होते.
खा. मोहिते-पाटील म्हणाले, '२००९ ला ज्यावेळी विजयदादा माढ्यातून उभा राहणार होते त्यावेळी आमचा अपप्रचार केला. आमच्यावर आरोप केले. आणि त्यावेळेपासून जिल्ह्याचे जे नुकसान झाले ते आजही भरून निघाले नाही. त्यांनी शरद पवार यांच्याशी गद्दारी केल्यामुळेच त्यांना उमेदवारी दिली नाही. कृष्णा-भीमा स्थीरिकरणाची चेष्टा केली. केळी संशोधन केंद्राला अडचणी आणल्या आणि आज खोटं बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत. सीना-माढा योजनेचे पाणी 'टेल टू हेड' देण्यासाठी मी खासदार या नात्याने व अभिजित पाटील आमदार या नात्याने चोवीस तास काम करू, असे सांगितले.

अभिजित पाटील म्हणाले, खा. शरद पवार यांनी टाकलेला विश्वास आणि माझ्यासाठी जमलेला जनसमुदाय हीच माझी खरी दौलत आहे. सीना-माढा योजनेच्या बाबतीत अफवा पसरवल्या जात आहेत. त्यावर विश्वास ठेवू नका मी ती योजना पूर्ण करून पूर्ण क्षमतेने चालवून दाखवतो. माझ्यावर सगळ्या धाडी पडून झाल्या आहेत. आता मला फक्त जनतेसाठी एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून काम करण्याची संधी मिळावी, असे आवाहन केले.यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, भारतनाना पाटील, संजय कोकाटे, भारत शिंदे, बाळासाहेब पाटील,राजाभाऊ गायकवाड, अनिल पाटील,  मधूकर देशमुख, बाबूतात्या सुर्वे, राम  म्हस्के, पोपट अनपट, रावसाहेब देशमुख,  बाळासाहेब ढवळे, बलभीम लोंढे, अमोल पाटील, प्रशांत पाटील, हरीदास  रणदिवे, संजय मस्के, विलास देशमुख,  गोविंद देशमुख, ऋषिकेश बोबडे, दिनेश जगदाळे, दीपक देशमुख, आनंद कानडे, भगत, विजय पवार, सौदागर जाधव, ज्योतीताई कुलकर्णी, रत्नप्रभा जगदाळे, विनंती कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर  उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments