मतदारसंघाच्या विकासासाठी आ. माने यांना विजयी करा : विक्रांत पाटील
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता मोहोळ मतदारसंघासाठी भरघोस निधी आणून मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने विकास केलेल्या आ.यशवंत माने यांनाच प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन लोकनेते साखर कारखान्याचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केले. तालुक्यातील आष्टी पेनूर, तामडाग वस्ती (पेनूर) विरवडे (खुर्द) शेजबाभुळगाव येथे
मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार यशवंत माने यांच्या
प्रचारार्थ उपस्थित जनसमुदायास संबोधित करून प्रचंड बहमतांनी विजयी करण्याचे लोकनेते शुगरचे अध्यक्ष बाळराजे पाटील यांनी केले. विरोधकांना विकासकामा बद्दल बोलता येत नाही म्हणून ते अनगरकरावर आणि आमदार यशवंत माने यांच्या विरोधात बोलत आहेत. यशवंत माने यांनी मोहोळ मतदार संघात विकासाचा डोंगर उभा केला आहे. त्यामुळे मतदारसंघाचा उर्वरीत विकास करण्यासाठी मतदारांनी पुन्हा एकदा मोहोळचे आमदार म्हणून यशवंत माने यांनाच विळजयी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी महायुतीचे नेते, पदाधिकारी, युवा कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments