Hot Posts

6/recent/ticker-posts

जो कोणी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करेल त्याचा चेहरा समाजापुढे आणणार- साखळकर

 जो कोणी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करेल त्याचा चेहरा समाजापुढे आणणार- साखळकर




अकलूज (कटूसत्य वृत्त):- मराठा समाजामध्ये जो कोणी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करेल त्याचा चेहरा समाजापुढे आणणार असल्याचे अखंड मराठा समाजाचे धनंजय साखळकर यांनी अकलूज येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.यावेळी माळशिरस तालुका अखंड मराठा समाजाचे , समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    पुढे बोलताना धनंजय साखळकर म्हणाले की साडे तीन लाखापैकी, एक लाख 25 हजार मतदान हे मराठा समाजाचे आहे.गेले 70 वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आहे.आणखी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही.यामुळे गरजवंत गरीब मराठा अतिशय नाराज आहे. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने,सध्या आम्ही गावभेट दौरा करणार आहे.माळशिरस तालुक्यातील एकशे दहा गावांना भेटी देऊन समाजाची व इतर समाजाला सोबत घेऊन,मते जाणून घेणार आहे.त्याचा अहवाल संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले तर सध्या आमचा कोणत्याही पक्षाचे उमेदवार यांना पाठिंबा नाही असेही साखळकर म्हणाले.
Reactions

Post a Comment

0 Comments