Hot Posts

6/recent/ticker-posts

महादेव कोगनुरे : मनसेच्या पदयात्रेला नीलम नगरात जोरदार प्रतिसाद

 कारखानदार विरुद्ध नोकरदार अशी ही निवडणूक


महादेव कोगनुरे : मनसेच्या पदयात्रेला नीलम नगरात जोरदार प्रतिसाद




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दक्षिण सोलापूर मतदारसंघातील सामान्य मतदारांना हे माहिती आहे की महादेव कोगनुरे हा जनसेवक आहे. प्रामाणिक आहे. धनाढ्य कारखानदार नाही. त्यामुळे सामान्य जनता माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांनी केले.
सोलापूर शहरात ठिकठिकाणी निघालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदयात्रेला आज पदाधिकारी कार्यकर्ते आणि सामान्य मतदारांनी जोरदार प्रतिसाद दिला. सकाळी आठ ते दुपारी एकपर्यंत आकाशवाणी केंद्र, जगदंबा देवी मंदिर, भावताऋषी नगर, ज्योती नगर, जाधव पिठाची गिरणी, शरणबसवेश्वर नगर, भाग्यश्री नगर, गवळी वस्ती, बनशंकरी बोळ, गंगा चौक, नवदुर्गा मंदिर, नीलम नगर,  गणेश मंदिर, करली चौक, थोबडे बस स्टॉप, महांतेश्वर मंदिर, मार्कंडेय चौक, शिवशरण मठ, मोनेश्वर शाळेकडून डावीकडे जमादार वस्ती, तक्का वस्ती, विजयनगर आदी भागात पदयात्रा निघाली.
हातात मनसेचे झेंडे, गळ्यात पटके घालून ज्येष्ठ नागरिक, तरुण, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. 'आवाज कुणाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा', 'महादेव कोगनुरे यांचा विजय असो' अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. सामान्य मतदारांनीही आतषबाजी करून पुष्पगुच्छ देऊन पुष्पहार घालून कोगनुरे यांचे स्वागत केले.


भाजपच्या गडात मनसेची हवा
नीलम नगर गणेश मंदिर परिसर भारतीय जनता पक्षाचा गड मानला जातो त्या भागातही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महादेव कोगनुरे यांना जोरदार प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी अनेक महिलांनी यांची औक्षण करून आशीर्वाद दिले. पदयात्रेत माता-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

पारंपरिक वाद्यांचा गजर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या पदयात्रेचे वेगळेपण म्हणजे तुतारीसह ढोल ताशे अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात ही पदयात्रा निघाली. शिस्तीत आणि उत्साहात निघालेल्या या पदयात्रेचे दक्षिण सोलापूर मतदारसंघातील मतदारांनी कौतुक केले.
Reactions

Post a Comment

0 Comments