पंढरपूर विधानसभा मतदार संघात 14 नोव्हेंबर पासून गृह मतदानाला प्रारंभ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, November 13, 2024

पंढरपूर विधानसभा मतदार संघात 14 नोव्हेंबर पासून गृह मतदानाला प्रारंभ

 पंढरपूर विधानसभा मतदार संघात 14 नोव्हेंबर पासून गृह मतदानाला प्रारंभ



                                            

 

                पंढरपूर (कटूसत्य वृत्त):-  252 पंढरपूर विधानसभा मतदार संघात  दिनांक 14 नोव्हेंबर पासून  गृह मतदानाला (होम वोटिंग) सुरुवात होणार आहे.  निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 85 वर्ष वयापेक्षा जास्त वय असलेल्या  तसेच दिव्यांग मतदाराला त्यांची इच्छा असल्यास  गृह मतदान करण्याची  सोय उपलब्ध करुन देण्यात आली असून दिनांक 14, 15 व 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत  गृह मतदान घेण्यात येणार असल्याची  माहिती पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे  निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी दिली.

             पंढरपूर विधानसभा मतदार संघातील  अशा मतदारांना टपाली मतदानाचे नमुना 12 ड अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले होते. त्यापैकी प्राप्त झालेल्या अर्जावर निर्णय घेण्यात आला असून , पंढरपूर  विधानसभा मतदार संघात 85 वर्ष वयापेक्षा जास्त वय असलेल्या  तसेच दिव्यांग मतदारांची संख्या 472 इतकी आहे. या मतदानाकरीता मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांची 20 पथके नेमण्यात आली आहेत. प्रत्यक्ष मतदानाच्या ठिकाणी उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतात. या सर्व मतदान प्रक्रियेचे  व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहे. गृह मतदानास संबधित मतदारांनी  सहकार्य करावे असे आवाहन  निवडणूक निर्णय अधिकारी  इथापे यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages