Hot Posts

6/recent/ticker-posts

पैसे लुबाडण्यासाठी विरोधकांचा सत्तेवर डोळा

 पैसे लुबाडण्यासाठी विरोधकांचा सत्तेवर डोळा



केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा घणाघात


 मुंबई (कटूसत्य वृत्त):- केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारचे समाजातील प्रत्येक घटक आणि वर्गाचा विकास या एकमेव ध्येयपूर्तीसाठी युद्धस्तरावर काम सुरू आहे. मात्र महाविनाश आघाडीला गरीब कल्याणाशीराज्याच्या सर्वांगीण विकासाशी काहीही देणेघेणे नसून त्यांचा डोळा फक्त खुर्चीकडे आहे. खोटेनाटे बोलूनखोटी आश्वासने देऊन जनतेची  दिशाभूल करत सत्ता बळकवायची आणि पैसे लुबाडण्यासाठी सत्ता हे महाविनाश आघाडीचे एकमेव ध्येय आहे असा घणाघात केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुधवारी भोकर येथे केला. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपा - महायुतीचे उमेदवार डॉ. संतुकराव हंबर्डे आणि भोकर विधानसभेसाठीच्या उमेदवार श्रीजया अशोक चव्हाण यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत ते बोलत होते. या सभेला व्यासपीठावर लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार संतुकराव हंबर्डे यांच्या कन्या शिवानी हंबर्डेभाजपा जिल्हाध्यक्ष किशोर देशमुखमाधव पाटीलशिवसेनेचे दत्ता पाटीलविकास देशमुखराष्ट्रवादी कॉंग्रेसचे शशी पाटील आणि रिपाइं चे गजभरे आदी उपस्थित होते.

यावेळी श्री शिंदे म्हणाले कीया विधानसभा निवडणुकीत जातीपातीचे राजकारण करणा-याभ्रष्टाचार करणा-या आणि परदेशात आरक्षण संपवण्याची भाषा करणा-या महाविनाश आघाडीच्या तीन पक्षांसोबत महायुतीचा लढा आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान करताना विरोधकांची भ्रष्टाचाराची हंडी आपल्याला फोडायची आहे हे लक्षात ठेवा असे म्हणत श्री. शिंदे म्हणाले की जनतेचा विश्वास हेच धन आणि विकास हेच ध्येय असणा-या महायुतीला संधी द्या असे आवाहन त्यांनी केले. चुकूनमाकून महाविनाश आघाडीला निवडून द्याल तर आरक्षण संपुष्टात येणारजातीपातीत भिंत उभी राहणार आणि सध्या होणा-या विकास कामांना खीळ बसणार. महायुती सरकारने जनतेसाठी तिजोरी खुली केली तर मविआ सरकारने कोविड काळातही विविध घोटाळे करत सरकारी तिजोरी लुटली होती याची आठवण त्यांनी करून दिली .

दिल्लीचेही तख्त राखतो ...’

दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा ...’ या महाराष्ट्र गीताच्या पंक्ती म्हणत श्री. शिंदे यांनी राज्याच्या विकास आणि प्रगतीसाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे असे भावनिक आवाहन केले. लोकसभा पोटनिवणुकीत श्री. हंबर्डे यांना आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार श्रीजया चव्हाण यांना मतपेटीतून बळ द्या असेही श्री. शिंदे म्हणाले.


Reactions

Post a Comment

0 Comments