काडादी यांच्या विजयासाठी नारीशक्ती उतरली प्रचारात नेहरू नगर, कमला नगर, माशाळवस्ती भागात भव्य पदयात्रा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, November 15, 2024

काडादी यांच्या विजयासाठी नारीशक्ती उतरली प्रचारात नेहरू नगर, कमला नगर, माशाळवस्ती भागात भव्य पदयात्रा

 काडादी यांच्या विजयासाठी 

नारीशक्ती उतरली प्रचारात

नेहरू नगर, कमला नगर, माशाळवस्ती भागात भव्य पदयात्रा

सोलापूर(कटूसत्य वृत्त):-सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या विजयासाठी नारीशक्ती प्रचारात उतरली असून विजापूर रोड भागातील या पदयात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

सौ. उमा काडादी, सौ. तेजश्री काडादी, सौ. सुप्रिता चाकोते, माजी महापौर अलकाताई राठोड यांच्यासह हजारो माता भगिनी पदयात्रेत सहभागी झाले होते. कमला नगर, सुशील नगर, नेहरूनगर, माशाळवस्ती या भागातून पदयात्रा जात असताना नागरिकांनी मोठ्या उत्साहाने स्वागत केले. उमा काडादी यांचे औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

धर्मराज काडादी यांच्याकडे विकासाची दृष्टी आणि सोलापूरच्या विकासाच्या नवनवीन संकल्पना असल्याने आम्ही त्यांनाच विजयी करण्याचा संकल्प केला असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. हद्दवाढ भागात अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्याची धमक काडादी यांच्यामध्येच असल्याने सक्षम उमेदवार म्हणून आम्ही त्यांनाच निवडून आणण्याचा निर्धार केला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस बाळासाहेब मोरे तसेच किशोर लवंगे यांनी  सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages