Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकमाता' अहिल्यादेवींचे प्रेरणादायी प्रशानकार्य : प्रो.डाॅ.सुवर्णा गुंड

 लोकमाता' अहिल्यादेवींचे प्रेरणादायी प्रशानकार्य : प्रो.डाॅ.सुवर्णा गुंड 

मोडनिंब  (कटूसत्य वृत्त):- 'लोकमाता' ही अहिल्यादेवी होळकर यांना प्रजेनं दिलेली पदवी अतिशय सार्थ ठरली आहे. त्यांनी अखंड हिंदुस्थानला एक राजनैतिक वारसा दिला आहे.  त्यामुळेच त्यांना पुण्यश्लोक, धर्मरक्षक, लोकमाता या पदव्या लोकांनी बहाल केल्या असे प्रतिपादन प्रोफेसर डॉ. सुवर्णा गुंड-चव्हाण यांनी केले.
श्री पांडुरंग प्रसारक मंडळ संचालित, उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालय, पंढरपूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या आभासी पटलाद्वारे समस्त विद्यार्थ्यांना प्रबोधित करताना त्या बोलत होत्या. लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या  जन्मशताब्दी वर्षानिमित्त डॉ. गुंड-चव्हाण यांचे व्याख्यान आयोजित केले होते. 
उमा शिक्षण संकुलाचे कार्यवाह डॉ. मिलिंद परिचारक, जनसंपर्क अधिकारी सुर्यकांत पारखे, प्रा. विलास बंडगर, प्रा.सविता दुधभाते, बी.एड. प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी  मान्यवर यावेळी उपस्थित होते. तनुजा सुपले यांनी यांनी  प्रास्ताविक केले. सुत्रसंचलन स्मिता जाधव यांनी केले तर आभार प्रथमेश शेटे यांनी मानले.

Reactions

Post a Comment

0 Comments