भाजपाने विश्वासात न घेतल्यास शिवसेना विरोधात काम करणार : सतीश सपकाळ
नातेपुते (कटूसत्य वृत्त):-नेहमीच शिवसेनेला भाजपाकडून सापत्न वागणूक देत असते. माढा लोकसभा असो वा विधानसभा असो युतीधर्म पाळल्या जात नसल्याने शिवसेना शिंदे गटाचे माळशिरस तालुक्यातील पदाधिकारी भाजपशी फारकत घेऊन आहेत.भाजपाने शिंदे गटातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेतल्यास माळशिरस तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी वेगळा निर्णय घेऊन भाजपा विरोधात काम करणार असल्याचे मत शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य सतीश सपकाळे यांनी घेण्यात आलेल्या बैठकीत व्यक्त केले.यावेळी घेण्यात आलेल्या बैठकीस तालुका संघटक समिर शेख, उपाध्यक्ष संतोश गोरे, माळशिरस शिवसेनेचे महादेव जगताप, अकलूज रणजीत गायकवाढ, महेश पवार, बापू क्षीरसागर,लखन वावरे, विठ्ठल शिंदे, राहूल खिलारे, विजय बरडकर तसेच महिला आघाडीच्या निता शिंदे, रोहिणी आहिरे, मोनाली शिंदे, उज्वला गिरमे, रंजना शिंदे, तसेच माळशिरस तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व महिला आघाडीच्या महिला या बैठकीसाठी उपस्थित होत्या.

0 Comments