नियमितपणे योग केल्याने आरोग्य उत्तम आणि शरीर निरोगी -काडादी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नियमितपणे योग केल्याने आरोग्य उत्तम आणि शरीर निरोगी राहते.निरोगी शरीरात निकोप विचार कार्यरत राहतात. त्यामुळे शरीर निरोगी राखण्यासाठी योग करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन श्री सिध्देश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी केले.रविवारी, श्री सिध्देश्वर साखर कारखाना परिसरातील कर्मयोगी अप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवन येथे शरीर शुध्दी आणि तणावमुक्त जीवनाचा मार्ग दाखविण्यासाठी भारतीय योग संस्थान दिल्लीच्या सोलापूर याप्रसंगी शाखेच्यावतीने दोन दिवसीय शंख प्रक्षालन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरातकाडादी बोलत होते. महाराष्ट्राचे उपप्रांतप्रधान डॉ. उत्तम काळवणे,छत्रपती संभाजीनगर आणि विभागाचे विभागीय संजय औरंगाबादकर,सोलापूर प्रधान शुद्धता उत्तम आरोग्यासाठी आहारावरही नियंत्रण असणे गरजेचे आहे.शिवाय आहार आणि आचरणात आवश्यक असल्याचे काडादी यांनी सांगितले. भारतीय योग संस्थानचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गारही काडादी यांनी काढले.वरिष्ठ योग अधिकारी भगवानसिंह होते. चव्हाण, माधुरी चव्हाण,सोलापूरचे जिल्हा प्रधान डी. पी. चिवडशेट्टी, सोलापूर शहर जिल्हा प्रधान शेखर लक्ष्मेश्वर, जिल्हा मंत्री बी. एन. पाटील, शहर जिल्हा मंत्री तेजल बत्तुल, शिबिर प्रमुख डी. डी. कुलकर्णी, शिबिर प्रमुख रितु कटकधोंड आणि राजेश्वरी कोंगारी, विशाखा रेठरे, लक्ष्मी दोरनाल आदी मान्यवर उपस्थित चिवडशेट्टी यांनी प्रारंभी स्वागत करून प्रास्ताविक केले. भारतीय योग संस्थानच्या विविध उपक्रमांना काडादी यांचे नेहमीच सहकार्य मिळत असल्याचे चिवडशेट्टी यांनी सांगितले.आगामी निवडणुकीत कुशल प्रशासक आणि समाजाच्या शेवटच्या घटकांच्या कल्याणाचा विचार करणाऱ्या काडादी यांच्या पाठीशी जनता नक्कीच राहील,असा विश्वास चिवडशेट्टी यांनी व्यक्त केला.

0 Comments