Hot Posts

6/recent/ticker-posts

  प्रिसीजन गप्पा या दिवाळीपूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांची रविवारी सुरेल सांगता पार पडला  



सोलापूर(कटूसत्य वृत्त):- प्रिसीजन फाउंडेशनच्यावतीने छत्रपती रंगभवन येथे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या प्रिसीजन गप्पा या दिवाळीपूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांची रविवारी सुरेल सांगता झाली.काल अखेरच्या दिवशी 'अभंग रिपोस्ट' या सुरमई कार्यक्रमाने सोलापूरकर रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रतिश मस्के, अजय वाव्हाळ, तुषार तोत्रे, विराज आचार्य, दुष्यंत देवरुखकर, स्वप्निल तरफे या कलावंतांनी विविध संतांच्या रचना तसेच पारंपरिक अभंगांना नव्या पिढीच्या नव्या भाषेत म्हणजेच फ्युजन संगीताचा साज देत भन्नाट कार्यक्रम सादर केला.प्रत्येक रचनेच्या नव्याने सादर झालेल्या रचनेला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. संगीताला भौगोलिक सीमा नाही. कोणताही प्रदेश संगीताला रोखू शकत नाही. संगीत ही कला वैश्विक आहे. पाश्चात्य वाद्यांवर पाश्चात्य ताल, लय व सूरात भारतीय अभंगरचना ऐकणे ही खरेतर वेगळी अनुभूती होती. भारतीय लोकसंगीत, अभिजात संगीत व पाश्चात्य लयसंगीत यांची खमंग - अभंग भेळच यानिमित्ताने रसिकांनी आस्वादली, असे म्हणता येईल.वेस गिटार, लिड गिटार, हार्मो निअम, ड्रमसेट, तवला, दिमडी, ट्रिपल सेट, टोन डिस्क, ड्रमसेट व लोकसंगीत मुंबई लोकलच्या पटरीवरून जातानाचा आवाज, असे वेगळे प्रयोग करत कलावंतांनी वेगवेगळे सुंदर अभंग श्रोत्यांच्या काळजात रिपोस्ट केले. प्रारंभी विठ्ठलाचा गजर हृदयातून येतो, असे सांगत सर्व प्रेक्षकांना विठ्ठलाचा जयघोप करायला लावला.मनी नाही भाव, देवा मला पाव,मुंगी साखरेचा रवा, जसे दुधामध्ये लोणी तसा देही चक्रपाणी, देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर, देवाचिये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारी साधियेला, पापाची वासना को दावू डोळा, दीपा नाही पाठी पोटी अंध:कार, सर्वांगी साखर अवघी गोड, चंदनाचे हात पायही धून, कशाला काशी जातो रं वावा, कशाला पंढरी जातो, चल गं सखे चल गं सखे पंढरीला.. अशा विविध अभंग रचना व भक्तिगीतांमुळे रंगभवन भक्तिरसात तल्लीन झाले. या कार्यक्रमात संत ज्ञानदेव, संत तुकाराम महाराज, संत तुकडोजी महाराज यांच्यासह विविध संतांच्या रचना सादर करून कलावंतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाची सांगता आधुनिक पद्धतीने पसायदान सादर करुन झाली.प्रारंभी उद्योग समूहाचे अध्यक्ष यतीन शहा, फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. सुहासिनी शहा, संचालक रवींद्र जोशी यांच्या हस्ते कलावंतांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन माधव देशपांडे यांनी केले.


Reactions

Post a Comment

0 Comments