राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अनिल सावंत यांनी भरला उमेदवारी अर्ज - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, October 29, 2024

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अनिल सावंत यांनी भरला उमेदवारी अर्ज

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अनिल सावंत यांनी भरला उमेदवारी अर्ज


पंढरपूर  (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या वतीने आज त्यांनी जेष्ठ राष्ट्रवादी नेते सुभाष भोसले यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत शरद पवार साहेब यांच्या आदेशाने मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे असे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले तसेच पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे.व हा मतदारसंघ राष्ट्रवादीचाच आहे.मी या मतदारसंघातील जनतेचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी व पंढरपूर मंगळवेढा या तिर्थक्षेत्राचा विकास व्हावा यासाठी कार्य करणार आहे.

 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages