समाधान आवताडे यांनी उमेश परिचारक यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत आज महायुतीचे अधिकृत उमेदवार समाधान आवताडे यांनी 252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी आज भारतीय जनता पार्टी या पक्षातून दोन नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.
यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील विविध प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून महायुती सरकारच्या सहकार्याने भरपूर विकासाची योजना या मतदारसंघात आणली आहेत.या विकास कामांच्या जोरावरच जनता मला मोठ्या मताधिक्यने विजयी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आज उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी आ. समाधान आवताडे यांच्या सोबत युटिपीन शुगरचे चेअरमन तथा पांडुरंग परिवाराचे नेते उमेश परिचारक हे उपस्थित होते तर मोजक्या मान्यवर कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते यावेळी उपस्थितीत होते
0 Comments