*पोलीस हवालदार अमृत खेडकर ठरले सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील प्रथम
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- Goa येथील 'Ironman' स्पर्धेत सोलापूर ग्रामीण पोलीस दलात टेंभुर्णी पोलीस ठाणे कार्यरत असणारे पोलीस हवालदार अमृत खेडकर यांनी मिळवला सोलापूर ग्रामीण पोलीस दलात प्रथम Ironman होण्याचा बहुमान
इंटरनॅशनल ट्रायथलॉन Ironman स्पर्धा 27 डिसेंबर रोजी गोवा येथे झाली असून, 50 देशातील विविध भागातील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. थरार गोवा येथे अनुभवायला मिळाला. या स्पर्धेत सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील अमृत खेडकर यांनी सहभाग नोंदविला होता.
सर्वात अवघड मानल्या जाणाऱ्या स्पर्धेपैकी एक असलेली ही स्पर्धा . गोवा येथील मिरामार बीच मधील समुद्रात स्पर्धेचा प्रारंभ झाला असून, यात
१.९ किमी पोहणे,
९० किमी सायकल चालवणे आणि
२१.१ किमी धावणे यांचा समावेश होता..
Ironman स्पर्धा जगातील एक प्रसिद्ध स्पर्धा असून, स्पर्धक या स्पर्धेसाठी तयारी करत असतात. Ironman ट्रायथलॉन स्पर्धेचे ११३ किमी अंतर ८ तास आणि ३० मिनिटात पूर्ण करण्याचे आवाहन स्पर्धकांसमोर होते.
ही स्पर्धा यशस्वी करून सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी म्हणून इतिहासात प्रथम Ironman होण्याचा किताब अमृत खेडकर यांनी मिळविला आहे. ही स्पर्धा त्यांनी 7 तास 37 मिनिटात पूर्ण केली आहे.
यापूर्वी त्यांनी मागील वर्षी Bergman ही स्पर्धा पूर्ण केली होती..
सोलापूर ग्रामीण 2007 बॅचचे सर्व सहकारी मित्रपरिवार, तसेच करमाळा विभागीय अधिकारी अजित पाटील टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील एपीआय जोग
टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे
0 Comments