'न्याय आपल्या दारी': तालुक्यात फिरते लोक अदालत
व कायदेविषयक शिबिर
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):-समाजातील तळागाळातील लोकांना न्याय मिळावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सर्वोच्च न्यायालय यांच्या ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेतून सुरू केलेल्या फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबिराचे आयोजन राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये पंढरपूर तालुक्यातील गोपाळपुर, वाखरी व गुरसाळे या गावांमध्ये दि. २५ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत करण्यात आलेले आहे.
फिरते लोक आदालत तालुक्यातील गोपाळपुर, वाखरी व गुरसाळे गावात फिरून न्यायालयात प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहेत. तसेच कायदेविषयक शिबिराद्वारे जनजागृती केली जाणार आहे. सदर फिरते लोक अदालत यशस्वी करण्यासाठी संबंधित गावातील नागरिकांनी सहकार्य करावे व जास्तीत जास्त लाभ घेवून तडजोड योग्य प्रकरणे आपसात मिटवावी असे आवाहन. तालुका विधी सेवा अध्यक्ष समिती , तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश डि. एन. सुरवसे यांनी केले आहे.
0 Comments