लडकी बहीण योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान
नातेपुते (कटूसत्य वृत्त):-महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वकांक्षी असलेली 'माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना या योजनेच्या - यशस्वी अंमलबजावणी माळशिरस तालुक्यात झाली आहे. याबद्दल काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते विशेष सन्मानपत्र देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन माळशिरस पंचायत समिती ए. पी. जे. अब्दुल कलाम सभागृहामध्ये करण्यात आले होते. ज्यांनी विशेष प्राविण्य दाखवून योजना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले असे अंगणवाडी सेविका, मदतनीस, तलाठी, ग्रामसेवक, न कॉम्प्युटर ऑपरेटर व अनेक शासकीय अधिकारी यांचा गुलाब पुष्प, प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सरगर, सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सतीश सपकाळ, अकलूज उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार सुरेश शेजुळ, गटविकास अधिकारी डॉ. बाबासाहेब पवार, मुख्याधिकारी दयानंद गोरे ,नातेपुते नगरपंचायत मुख्याधिकारी माधव खांडेकर, नायब तहसीलदार सिद्धनाथ जावीर निवासी नायब तहसीलदार अमोल कदम, महिला व बालविकास अधिकारी आसमा आतार, बालाजी अल्लाडवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शामल कुलकर्णी यांनी केले असून आभार बालाजी अल्लाडवाड यांनी मानले.
0 Comments