ॲड. डॉ. स्वाती मोराळे यांची ग्राहक संरक्षण समितीच्या महाराष्ट्र राज्य कायदेशीर सल्लागार पदी निवड
मोडनिंब (कटूसत्य वृत्त) : ॲड. डॉ. स्वाती मोराळे यांची ग्राहक संरक्षण समितीच्या महाराष्ट्र राज्य कायदेशीर सल्लागार पदी निवड करण्यात आली आहे. ॲड. डॉ. स्वाती मोराळे या उच्चशिक्षित असुन नुकतेच त्यांनी एल. एल. बी. पदवी संपादित केली आहे. त्या गेली दहा वर्षे सामाजिक, पत्रकार, उद्योग क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी एम. एस. डब्लू., एल. एल. बी., बी. जे., बी. ए., बी. एड., डी. एड., डी. एस. एम., एम. बी. ए., डी. टी. एल., आणि डी. एल. एल. & एल. डब्ल्यू. अशा अनेक क्षेत्रात शिक्षण घेतले आहे. त्यांच्या शिक्षण, अनुभव व संघटनाचा फायदा समितीला होईल यासाठी ग्राहक संरक्षण समितीचे अध्यक्ष दादासाहेब केदारे व सचिव डॉ. अविनाश झोटिंग यांनी ॲड. डॉ. स्वाती मोराळे यांची समितीच्या महाराष्ट्र राज्य कायदेशीर सल्लागार पदी निवड केली आहे.
ग्राहकांच्या फसवणुकीला आळा घालणे, फसवणूक झालेल्या ग्राहकांना कायदेशीर मदत करणे त्यांच्या हक्काचे संरक्षण करणे यासाठी मी प्रयत्न करणार आहे असे त्यांनी सांगितले.
0 Comments