आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार . दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत उपस्थितांना संबोधित केलं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर मतदारसंघात अनेक विकासकामं मार्गी लावली. त्यांच्यात काम करण्याची धमक आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या अफवा विरोधकांकडून पसरवल्या जात आहेत. मी या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना आव्हान करतो की, त्या संदर्भातील कागदपत्र पुरावा म्हणून दाखवा. आम्ही रक्षाबंधनची ओवाळणीच नव्हे तर, भाऊबीजेची ओवाळणी देखील दिली. याशिवाय संविधान बदलण्याच्या बाबतीत सुद्धा अफवा पसरवण्यात आली. याउलट आम्ही प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारण्याचं काम हाती घेतलं आहे. अल्पसंख्याक समुदायासाठी राज्य सरकारनं महत्त्वपूर्ण काम केलं आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेनं आम्ही पुढे चाललो आहोत. मी कामाचा माणूस आहे. जे बोलतो ते स्पष्ट बोलतो. मी जातीपातीत मतभेद करत नाही. सर्व समाज घटकांना समान न्याय देण्याचा मी कायम प्रयत्न करत आलो आहे.
केंद्रामध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं आहे. केंद्रात आपल्या विचारांचं सरकार असल्यास आपली बरीच कामं वेळेवर मार्गी लागण्यास मदत मिळते आणि मोठ्या प्रमाणावर निधी आपल्याला आणता येतो. एकच विनंती करतो की, आगामी विधानसभा निवडणुकीत दत्तामामा भरणे यांना समर्थन द्या, त्यांना प्रचंड बहुमतानं निवडून द्या. ते निवडून आल्यास मला बळ मिळेल आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास देखील वेगानं साधता येईल.
0 Comments