पिंपरी दुमाला शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 16, 2024

पिंपरी दुमाला शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा

 पिंपरी दुमाला शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा

शिरूर (कटूसत्य वृत्त):- 15 ऑगस्ट राज्यस्तरीय उपक्रमशील आदर्श शाळा तीर्थक्षेत्र पिंपरी दुमाला येथे भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला  मोठ्या उत्साहात शाळेमध्ये कार्यक्रमाची सुरुवात सकाळी सात वाजता झाली  त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले  स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेमध्ये विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.त्यामध्ये सर्वांचे लक्ष भाषण स्पर्धा आणि देशभक्तीपर भाषणांनी वेधले. त्यानंतर  कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे आणि मुख्याध्यापक यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व व स्वातंत्र्य मिळण्यासाठी स्वातंत्र्यसेनानी चे योगदान याविषयी मार्गदर्शक भाषणे दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक कांताराम शिंदे यांनी केले विविध स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या द्वारे पुरस्कार देऊन सन्मानित करण्याले
 
शाळेचे मुख्याध्यापक राहुल चातुर,सहशिक्षक कांताराम शिंदे,शोभा डोळस यांनी १३ व १४ ऑगस्ट या दरम्यान हर घर तिरंगा अभियान प्रभावीपणे राबवून गावामध्ये स्वातंत्र्यदिनापूर्वी वातावरण निर्मिती केली होती. स्वातंत्र्यदिना दिवशी सर्व विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली.यानिमित्ताने शाळेत कवायत संचलन,विद्यार्थी भाषणे,गुणगौरव समारंभ,बक्षीस वितरण,मान्यवर मनोगते,साहित्य वाटप इ.कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच महेंद्र डोळस व प्रमुख पाहुणे म्हणून कैलाश सत्यार्थी फाउंडेशनचे समन्वयक निंबाजी नरवडे हे उपस्थित होते.

 विविध विषयांवर व सामाजिक परिस्थितीबाबत विद्यार्थ्यांनी केलेल्या भाषणांनी उपस्थित ग्रामस्थांची मने जिंकली.यादरम्यान राज्यस्तरीय गुणवत्ताधारक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सोहम टॅलेंट लिंक प्रा.लि.यांचे वतीने आदर्श सरपंच गायत्री चिखले व ज्ञानदेव चिखले यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व मेडल देऊन सन्मान करण्यात आला.उपस्थित ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना उपसरपंच शरद खळदकर,शालेय समिती अध्यक्ष शशिकांत चिखले, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुनील सोनवणे, शाळा समिती उपाध्यक्ष वर्षा खळदकर,संदीप सोनवणे,श्रीकांत सोनवणे यांनी स्वातंत्र्य दिना निमित्त शुभेच्छा दिल्या.

    शालेय समिती सदस्य विशाल खळदकर यांनी उपस्थित ग्रामस्थांचे आभार मानले  आणि सर्वात शेवटी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून आभार प्रदर्शन करण्यात आले व देशभक्तीपर नारे लावून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages