संकटसमयी ढाली प्रमाणे उभा निर्भीड छातीचा..
ना रक्ताचा मित्र ना कोणत्या जातीचा
संकटसमयी ढाली प्रमाणे उभा निर्भीड छातीचा..
येतील कितीही संकटे मजवर धावून,
हाक ना देता होई हजर मज पाहून..
होताच दिवा मी बनतो मित्र उजेड त्या वातीचा...1)
ना रक्ताचा मित्र ना कोणत्या जातीचा,
संकटसमयी ढाली प्रमाणे उभा निर्भीड छातीचा..
पाहिले गणगोत तुझ्यात जीवास तू आधार,
ठेस लागता तुज येई डोळ्यांत माझ्या धार..
दुःख ही भासे सुखात जसा प्रकाश तू काजव्याचा..3)
ना रक्ताचा मित्र ना कोणत्या जातीचा
संकटसमयी ढाली प्रमाणे उभा निर्भीड छातीचा..
गर्दीच्या त्या जगात देऊ एकमेकास रे हाक,
ना तुटणार दोस्ती जरी असेल विरोध लाख..
जन्मभर मागतो मी हात हवा त्या एक रे साथीचा..3
ना रक्ताचा मित्र ना कोणत्या जातीचा
संकटसमयी ढाली प्रमाणे उभा निर्भीड छातीचा..
कवी:गझलकार:गीतकार
रामप्रभू गुरुनाथ माने
सोलापूर.मो,9850236045
.jpg)
0 Comments