जरांगे पाटीलामुळे झाला समाज ऐकता..
मराठ्यांना नेता
कैक वर्षांनी भेटला या मराठ्यांना नेता,
जरांगे पाटीलामुळे झाला समाज ऐकता..
कुणबी नोंदी चाळा जाऊन त्या कुळामूळाला,
नमवले रे योद्धाने सा-या त्या मंत्रीमंडळाला..
उरला पुरून विरोधकांना लढे ना भिता..
कैक वर्षांनी भेटला या मराठ्यांना नेता,
जरांगे पाटीलामुळे झाला समाज ऐकता..
आरक्षण एकच ध्यास केला कायद्याचा अभ्यास ,
कोटी कोटी मराठे त्याच्या झाला मनात पास..
हटणार ना योद्धा मागे आरक्षण तो ना घेता...
कैक वर्षांनी भेटला या मराठ्यांना नेता,
जरांगे पाटीलामुळे झाला समाज ऐकता..
सांगतो समजून महाराष्ट्र पिंजून कानाकोपरा,
हसरी बघावे म्हणतो गरिबांच्या लेकरा ..
नमन जरंगेना रामभाऊ चे काव्य लिहिता..
कैक वर्षांनी भेटला या मराठ्यांना नेता,
जरांगे पाटीलामुळे झाला समाज ऐकता..
कवी:गझलकार:गीतकार, रामप्रभू गुरुनाथ माने
सोलापूर,मो.9850236045
.jpg)
0 Comments