Hot Posts

6/recent/ticker-posts

अश्विनी सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र नियमितची 42 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

 अश्विनी सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र नियमितची 

42 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-अश्विनी सहकारी रुग्णालय व संशोधन केंद्र नियमित, सोलापूर या संस्थेची 42 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि.18/08/2024 रोजी सकाळी 10.00 वाजता सोलापूर गुजरात भवन, मुरारजी पेठ, सोलापूर येथे रुग्णालयाचे चेअरमन बिपीनभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीपणे संपन्न झाली.

सभेच्या सुरुवातीस संस्थेचे संचालक  चंद्रशेखर स्वामी यांनी सर्व उपस्थित सभासदांचे स्वागत केले व सभेचे अध्यक्षस्थान स्विकारणेकरिता चेअरमन बिपीनभाई पटेल यांचे नाव सुचविले व संचालक डॉ.विजय पाटील यांनी त्यास अनुमोदन दिले.  त्यानंतर सभाध्यक्ष चेअरमन बिपीनभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे कामकाज सुरु झाले.  सभेच्या सुरुवातीस दिवंगत व्यक्तींना श्रध्दांजली वाहण्यात आली.

प्रशासकीय अधिकारी  सचिन बिज्जरगी यांनी अजेंड्यावरील विषयांचे व मागील सभेच्या वृत्तांताचे वाचन केले.  त्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात आली.  सभाध्यक्ष बिपीनभाई पटेल यांनी अहवालसालात संस्थेने केलेल्या प्रगतीसंबंधी, तसेच वार्षिक अहवाल व ताळेबंदासंबंधी सभेत माहिती दिली.  दि. 31 मार्च 2024 अखेरचा वार्षिक अहवाल, ताळेबंद तसेच उत्पन्न खर्च पत्रकास व अजेंड्यावरील सर्व विषयास एकमताने मंजूरी देण्यात आली.

75 वर्षे पूर्ण झालेल्या उपस्थित सभासदांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.  यावेळी काही सभासदांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले व सत्काराबद्दल संस्थेचे आभार मानले.  

याप्रसंगी सभासद राजाराम गोसकी,  रविंद्र आडकी, यशवंत पत्की, संजय शक्करशेट्टी व इतर सभासदांनी आपले मनोगत व्यक्त केले व काही सूचना केल्या.   

सभासद प्रा.श्रीकांत येळेगांवकर यांनी संस्थेच्या अभिनंदनाचा ठराव मांडला व तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

सभेस बहुसंख्य सभासद बंधू-भगिनी हजर होते.  सभेस संचालक वेणुगोपाळ तापडीया,  संजीव पाटील, भैरुलाल कोठारी, जयेशभाई पटेल, मेहूल पटेल, श्रीमती यशोदाबाई डागा,अशोक लांबतुरे, डॉ.राजीव प्रधान, गणेश तापडीया, विलास पाटील आणि वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रशांत औरंगाबादकर, उपप्रशासकीय अधिकारी विरेंद्र चिप्पा व अन्य अधिकारी वर्ग आणि इतर कर्मचारीवर्ग हजर होते.

संचालक डॉ. विजय पाटील यांनी सर्व उपस्थित सभासदांनी खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पाडल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.  अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या पुढील प्रगतीकरिता सर्व सभासदांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले.  सभाध्यक्षांच्या परवानगीने सभा संपल्याचे जाहीर केले.

Reactions

Post a Comment

0 Comments