माऊली महाविद्यालय, वडाळा येथे रक्षाबंधन (नारळी पौर्णिमा) हा सण अतिशय उत्साहात साजरा
वडाळा (कटूसत्य वृत्त):-आज माऊली महाविद्यालय, वडाळा येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग, समाजशास्त्र विभाग, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, अंतर्गत तक्रार निवारण समिती व महिला सक्षमीकरण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधन (नारळी पौर्णिमा) हा सण अतिशय उत्साहात साजरा करण्यात आले.या सणानिमित्त माऊली महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी पर्यावरण पूरक राखी निर्मिती करून या राख्या आमच्या संस्थेच्या माऊली मतिमंद विद्यालयातील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थी बंधूंना बांधून हा सण मोठा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष भोसले, IQAC चे समन्वयक प्रा.डॉ.विजय म्हमाणे, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. डॉ. दत्तात्रय हरवाळकर, प्रा. डॉ. सौ .प्रतिभा बिरादार , प्रा.सौ.टोणपे मॅडम उपस्थित होते. माऊली महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वतःच्या कल्पनेनुसार कौशल्याचा उपयोग करून पर्यावरण पूरक राखीची निर्मिती घरी स्वतः तयार केली, अतिशय सुंदर या पर्यावरण पूरक राख्यांची निर्मिती केल्यानंतर सालाबादाप्रमाणे माऊली मतिमंद निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. माऊली मतिमंद निवासी विद्यालयातील पन्नास विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या हाथाने रक्षाबंधन करण्यात आले. समाजापासून उपेक्षित असलेल्या मुलांना भारतीय संस्कृतीमध्ये भाऊ आणि बहीनीच जे प्रेमाचं, आपुलकीचं, विश्वासाचे अतूट नातं आहे, या नात्याची ओळख किंवा या नात्याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना पण मिळावी, अनेक सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून माऊली महाविद्यालयाच्या वतीने हा उपक्रम राबवला जातो. या राख्या बनवण्यासाठी मुलींनी गहू, तांदूळ, फुल, कागद, मसूर डाळ, तूर डाळ काडीपेटी, फुले, पाने, मोरपीस आणि कागद या साहित्यांचा वापर करून अतिशय सुंदर व सुबक अशा राख्या बनवल्या.
या कार्यक्रमास माऊली मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय वाघमारे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच महाविद्यालयातील प्रा.परमेश्वर हटकर, प्रा. बालाजी गंगावणे, सर्व प्राध्यापक, उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. परमेश्वर हटकर व आभार प्रदर्शन प्रा. डॉ.दत्तात्रय हरवाळकर यानी मानले.


0 Comments