Hot Posts

6/recent/ticker-posts

राज्य विजेते सोलापूरच्या कुमार व किशोरी खो-खो संघाचा सत्कार क्रीडा फेडरेशनचे अध्यक्ष महेश गादेकर व राष्ट्रीय खेळाडूंचाही सन्मान

 राज्य विजेते सोलापूरच्या कुमार व किशोरी खो-खो संघाचा सत्कार

क्रीडा फेडरेशनचे अध्यक्ष महेश गादेकर व राष्ट्रीय खेळाडूंचाही सन्मान

सोलापूर,  (कटूसत्य वृत्त):-सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनच्या वतीने गतवर्षीच्या राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत विजेतेपद पटकाविलेल्या कुमार व किशोरी खो-खो संघ तसेच संघव्यवस्थापक, प्रशिक्षक व निवड समिती सदस्य आणि गतवर्षीच्या राष्ट्रीय अजिंक्यपद सहभागी झालेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

हा सत्कार हॉटेल सिटी पार्कच्या हॉलमध्ये जिल्हा लॉन टेनिस संघटनेचे सचिव राजीव देसाई व जिल्हा  क्रिकेट संघटनचे संयुक्त सचिव चंद्रकांत रेम्बर्सु यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा क्रीडा फेडरेशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महेश गादेकर यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्रीकांत ढेपे, जिल्हा खो-खो संघटनेचे सल्लागोर मनोज संगावार, सरचिटणीस ए. बी. संगवे, रामचंद्र दत्तू, मोहन रजपूत, शरद व्हनकडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजाराम शितोळे यांनी केले. श्रीरंग बनसोडे यांनी सूत्रसंचालन केले. अजित शिंदे यांनी आभार मानले.

सत्कारमूर्ती राज्य सुवर्ण पदक विजेते प्रशिक्षक उमाकांत गायकवाड. राष्ट्रीय खेळाडू सोनाली केत, रामजी कश्यप, अजय कश्यप,  सादिया मुल्ला, संस्कार शिंदे.राज्य विजेते संघ- किशोरी: श्रद्धा हनमगोंडा, रिया चव्हाण, अन्वयी मंडले, इशा गोगावे,अक्षरा मोरे, वैष्णवी कुदळे, कीर्ती काटे,सौम्या सोलापुरे, प्रांजली चव्हाण, अनुष्का पवार, समृद्धी सुरवसे, कल्याणी लामकाने, स्नेहा लामकाने, श्रावणी देठे, गौरी कोळवले, प्रशिक्षक : सुनील चव्हाण, संघ व्यवस्थापक :  सोनाली शिंदे-यादव निवड समिती सदस्य गोकूळ कांबळे, तुळशीराम शेतसंदी, अजित बनकर. कुमार : गणेश बोरकर, कृष्णा बनसोडे,  अरमान शेख, शंभूराजे चंदनशिव, प्रतीक शिंदे, फराज शेख, अविनाश हरबरे, रोहन रजपूत,  मोहन चव्हाण, नीरज कोळी, उमाजी केंगार, शुभम चव्हाण, महबूब शेख, सुजित मेटकरी  लक्ष्मण सलगरे.प्रशिक्षक : सोमनाथ बनसोडे, संघ व्यवस्थापक : सिद्धाराम गायकवाड. निवड समिती सदस्य राजाराम शितोळे, धोंडीराम पाटील व संतोष कदम.


Reactions

Post a Comment

0 Comments