मुलांच्या भवितव्यासाठी पालकांची जागरूकता आवश्यक-दत्तात्रेय वारे
शिरूर (कटूसत्य वृत्त):- स्पर्धा परीक्षांद्वारे मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची उत्तम जडणघडण होते,त्यासाठी आपल्या मुलांच्या हितासाठी पालकांनी जागृत असणे आवश्यक असल्याचे मत आंतरराष्ट्रीय शाळेचे निर्माते दत्तात्रय वारे यांनी व्यक्त केले.
विद्यार्थी विकास फाउंडेशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय अभिरूप व नॅशनल स्कॉलर परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा शिक्रापूर येथे आयोजित करण्यात आला होता.
पिंपरी दुमाला ता.शिरूर येथील जिल्हा परिषद शाळेतील प्रेम खळदकर, श्रेयश शिंदे,अथर्व जाधव,यज्ञेश सोनवणे या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सन्मान याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत यश प्राप्त केल्याबद्दल केंद्रप्रमुख यशवंत रणदिवे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
सन्मान सोहळ्याचे आयोजन परीक्षा प्रमुख महेश वेदपाठक, अमोल चांदणे,अजिंक्य हिरवे यांनी केले. याप्रसंगी मुख्याध्यापक राहुल चातुर, मार्गदर्शक शिक्षक कांताराम शिंदे,शोभा डोळस,शरद जाधव,वर्षा खळदकर, स्वाती शिंदे इत्यादी उपस्थित होते.
0 Comments