Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर शहर मध्य विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसला द्या : जाधव

 सोलापूर शहर मध्य विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसला द्या : जाधव


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा निवडून आणून अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे नियोजन करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी अजित पवार यांची मुबंईत भेट घेतली. त्या भेटीदरम्यान जाधव यांनी सोलापूर शहर मध्य विधानसभेची जागा राष्ट्रवादीला घेण्याची मागणी केली. यावेळी आमदार शिवाजीराव गर्जे, संजय बोर्गे, नागेश गायकवाड, चेतन गायकवाड, माणिक कांबळे, माऊली जरग, महादेव राठोड उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments