सिंहगड पब्लिक स्कूल केगाव सोलापूर येथे 78 वा स्वातंत्र्य दिन 'मेरी माटी मेरा देश ' हे अभियान राबवून उत्साहात साजरा करण्यात आला.
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-सिंहगड पब्लिक स्कूल केगाव येथे 78 वा स्वातंत्र्य दिन 'मेरी माटी मेरा देश' हे अभियान राबवून उत्साहात आणि जोशात साजरा करण्यात आला . 'मेरी माटी मेरा देश' हे अभियान म्हणजे आपल्या जन्मभूमीच्या अभिमानाच्या उत्कृष्ट आदर्शाचे स्मृतिचिन्ह आहे, या अभियानासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने आपापल्या घरून माती आणून त्याचा संग्रह केला. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती जागृत व्हावी यासाठी शाळेमध्ये वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले होते .त्यामध्ये हाऊस नुसार मार्च पास्ट , डान्स तसेच एक अनोखा उपक्रम म्हणून बस डेकोरेशन अशा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या . विशेष म्हणजे प्रत्येक मुलांनी आपापल्या बसचे डेकोरेशन लक्षवेधी केले होते .बस डेकोरेशन मध्ये प्रथम क्रमांक बस नंबर १०, द्वितीय क्रमांक बस नंबर ७ व तृतीय क्रमांक बस नंबर ४ ने पटकावला .मार्च पास्ट स्पर्धेमध्ये मध्ये प्रथम क्रमांक ग्रीन (कलाम) हाऊस ,द्वितीय रेड (रमण) हाऊस, तृतीय यलो(विक्रम) हाऊस व चतुर्थ क्रमांक ब्ल्यू (होमी)हाऊस ने पटकावला .डान्स स्पर्धे मध्ये प्रथम क्रमांक ग्रीन (कलाम )हाऊस, द्वितीय यलो(विक्रम) , हाऊस तृतीय रेड (रमण) हाऊस व चतुर्थ क्रमांक ब्ल्यू (होमी)हाऊस ने पटकावला . सर्व विजेत्यांना आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले सर व उपस्थित मान्यवर सी.आर.टी.डी.चे डायरेक्टर डॉ. एस.एच. पवार ,सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज ॲडमिन चे उपप्राचार्य डॉ. एस.एम.जगदे , अकॅडेमिक चे उपप्राचार्य डॉ. आर.टी. व्यवहारे , इस्टेट मॅनेजर डॉ. दत्तात्रय नवले यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
या सर्व कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले सर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच शाळेच्या प्राचार्या निखहत शेख व उपप्राचार्य प्रकाश नवले तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
0 Comments