राष्ट्रवादीच्या मेळाव्यात इच्छुक उमेदवारांशी जयंत पाटलांनी साधला संवाद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 19, 2024

राष्ट्रवादीच्या मेळाव्यात इच्छुक उमेदवारांशी जयंत पाटलांनी साधला संवाद

राष्ट्रवादीच्या मेळाव्यात इच्छुक उमेदवारांशी जयंत पाटलांनी साधला संवाद

            सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचा गुरुवारी मेळावा झाला. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

            विधानसभानिहाय इच्छुक उमेदवारांशी त्यांनी संवाद साधला. महाविकास आघाडीची एकत्रित बैठक होणार आहे. या बैठकीनंतर कोणत्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार द्यायचा, याचा निर्णय घेऊ. त्यानंतर इच्छुक उमेदवारांच्या पुन्हा एकदा मुलाखती घेऊ, असे यावेळी त्यांनी सांगितले.

            यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माढयाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खराटमल, माजी महापौर महेश कोठे, माजी महापौर एड. यु. एन. बेरिया यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages