Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकशाही बळकट करण्यासाठी संविधान वाचन, राष्ट्रवादी महिला आघाडीचा उपक्रम

लोकशाही बळकट करण्यासाठी संविधान वाचन, राष्ट्रवादी महिला आघाडीचा उपक्रम

               सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जनविश्वास सप्ताह अंतर्गत लोकशाही बळकट करण्याच्या उद्देशाने शाळा व महाविद्यालयात संविधान वाचन उपक्रम महिला विभागाचे शहराध्यक्ष संगीताताई जोगदनकर कार्याध्यक्ष चित्राताई कदम यांनी हाती घेतला आहे .


               भारतीय संविधान हे आपल्या लोकशाही व्यवस्थेचा मजबूत कणा आहे. स्वातंत्र्य, समता व सामाजिक न्याय या संविधानिक मूल्यांची जपणूक करून लोकशाही बळकट करण्याचा निर्धार संविधान वाचन करून राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी सोलापूर शहर आणि नीलकंठेश्वर प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला.

               जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान नीलकंठेश्वर प्रशालेचे अध्यक्ष भास्कर आडकी यांच्या प्रमुख उपस्थितीत या संविधान वाचन करण्यात आले यानंतर सर्व विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले.

               प्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले ज्येष्ठ नेते आनंद मुस्तारे भास्कर आडकी सेवा दल अध्यक्ष प्रकाश जाधव मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेराज आबादीराजे vjnt शहराध्यक्ष रुपेश भोसले ओबीसी सेल अध्यक्ष अनिल छत्रबंध वैद्यकीय अध्यक्ष बसवराज कोळी वाहतूक आघाडी अध्यक्ष इरफान शेख सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे शहर उत्तर विधानसभा कार्याध्यक्ष मनोज शेरला तनवीर गुलजार फिरोज शेख आयुब शेख दत्तात्रय बडगंची राजू पवार  दशरथ शेंडगे , महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम महिला समन्वयक शशिकला कस्पटे अध्यक्ष किरण माशाळकर कांचन पवार संगीता गायकवाड शोभा गायकवाड  रुक्मिणी ताई जाधव.सरोजना जाधव.प्रमिला स्वामी.सुनिता बिराजदार लक्ष्मी पवार आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments