बेरोजगारीवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न - सुरवसे पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, July 21, 2024

बेरोजगारीवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न - सुरवसे पाटील

बेरोजगारीवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न - सुरवसे पाटील

           पुणे (कटूसत्य वृत्त):- महागाई, बेरोजगारी व शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांसारख्या गंभीर मुद्यांवरून लक्ष विचलित करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग लाडकी बहीण योजना असून, त्याद्वारे दीड हजार रुपये देण्याची घोषणा जनसामान्यांची दिशाभूल करणारी आहे, असा टोला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी लगावला.

           प्रसार माध्यमांशी संवाद साधताना पुढे रोहन सुरवसे पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी मोठमोठी आश्वासने दिली होती. जाहीरनाम्यातील आश्वासने यावेळीही जुमलेबाजीच असल्याचे दिसते आहे. १५ लाख रुपयांचा मुद्दा आता केवळ दीड हजार रुपयांवर आणला असून, जनतेचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे, असे मत व्यक्त केले. सत्ताधाऱ्यांकडून भावनिकतेचे मुद्दे उपस्थित करून जनतेची दिशाभूल केली जात आहे. कृषिप्रधान देशातील शेतकरी, नोकरदार, कष्टकरी कामगारांच्या हितासाठी निर्णय कधी घेणार, महागाई आणि बेरोजगारीचा प्रश्न सुटण्याऐवजी जटिल बनत आहे. तरुणांच्या हाताला काम देण्याऐवजी बेरोजगार करणार का? युवा पिढीला दिशा दाखवणार की दिशाहीन बनवणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages