शिवरत्न शिक्षण संस्थेत रोटरी युथ कार्यशाळाचे उद्घाटन
अकलूज (कटूसत्य वृत्त):- रोटरी क्लब पुणे कोथरुड, सराटी डीलाईट व अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने शिवरत्न शिक्षण संस्थेत रोटरी युथ कार्यशाळाचे उद्घाटन शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ.शीतलदेवी धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर कार्पोरेटर ट्रेनर रो. उज्ज्वल तावडे पुणे, रो. सत्यजित चितळे पुणे, रो. उमेश कुलकर्णी पुणे, रो.वसंत कुलकर्णी, रो. सिद्ध, युथ डायरेक्टर रो. नितीन कुदळे, रो. नितीन दोशी, रोटरी सराटी चे आध्यक्ष रो.जगदीश कदम, सेक्रेटरी रो. महादेव पाटील , रोटरी अकलूजचे उपाध्यक्ष रो.नवनाथ नागणे, सेक्रेटरी रो.मनीष गायकवाड, रो.अजित वीर रो. डॉ.मनीषा गांधी, रो.मानसी कदम, रो.संयुक्ता दोशी शिवरत्न शिक्षण संस्थेचे सचिव धर्मराज दगडे, अश्रफ शेख उपस्थित होते.
यावेळी रो. सत्यजित चितळे यांनी आपत्कालीन घटना त्यावरील यशस्वी उपाय यावर तर रो.उज्ज्वल तावडे यांनी पॉझीटीव्ह मेंटल हेल्थ या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रो.अनिल जाधव यांनी केले. सूत्रसंचलन उपल्ली मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य कुंभार सर, प्राचार्य शिंदे सर, प्राचार्य हिरेमठ सर यांनी परिश्रम घेतले.
0 Comments