Hot Posts

6/recent/ticker-posts

वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव यात्रा शनिवारी सोलापुरात

वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव यात्रा शनिवारी सोलापुरात 

राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची होणार जाहीर सभा 

           सोलापूर (कटूसत्य वृत्त):- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एड. बाळासाहेब आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा शनिवार दि. 27 जुलै 2024 रोजी सोलापूर जिल्ह्यात येणार आहे. यानिमित्त सोलापूर शहरात त्यांची जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती जिल्हा निरीक्षक सोमनाथ साळुंके यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

      वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी दि. 26 जुलैपासून  छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करून आरक्षण बचाव यात्रा सुरु होणार आहे. तत्पूर्वी दि. 25 जुलै 2024 रोजी मुंबई येथील चैत्यभूमीला अभिवादन करून पुढे पुण्यातील फुले वाड्यात महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात येणार आहे.

      शनिवार दि. 27 जुलै रोजी सकाळी 10 वाजता सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात या यात्रेचे आगमन होणार आहे. त्या ठिकाणी कॉर्नर सभाही होणार आहे. दुपारी 1 वाजता पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर दुपारी 4 वाजता मोहोळ येथे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

         दरम्यान, सायंकाळी 6 वाजता ही आरक्षण बचाव यात्रा सोलापूर शहरात येणार आहे. शहरातून रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर या रॅलीचे रूपांतर जाहीर सभेत होणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सोमनाथ साळुंके यांनी केले आहे.

         या पत्रकार परिषदेस चंद्रशेखर मडीखांबे, अनिरुद्ध वाघमारे,  विनोद इंगळे, पांडुरंग खांडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments