Hot Posts

6/recent/ticker-posts

रणजितसिंह शिंदे व शिव विचार प्रतिष्ठान यांचे वतीने परतीच्या मार्गावर असलेल्या वारकऱ्यांना खिचडीचे मोफत वाटप

 रणजितसिंह शिंदे व शिव विचार प्रतिष्ठान यांच्या वतीने परतीच्या मार्गावर असलेल्या वारकऱ्यांना खिचडीचे मोफत वाटप 

सुमारे 45 हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ.

             टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त): रणजितसिंह शिंदे व शिव विचार प्रतिष्ठान यांचे वतीने परतीच्या मार्गावर असलेल्या वारकऱ्यांना खिचडीचे मोफत वाटप करण्यात आले या सेवेचा सुमारे 45 हजार वारकऱ्यांनी लाभ घेतला. पंढरपूर वरून परतीच्या मार्गावर असणाऱ्या सर्व विठ्ठल भक्त वारकऱ्यांसाठी ही सोय करण्यात आली होती गेल्या 3 वर्षापासून प्रतिष्ठान हा उपक्रम राबवित आहे पंढरपूर कडे जात असताना बऱ्याच ठिकाणी वारकऱ्यांची सोय होते परंतु परतीच्या मार्गावर ही विठ्ठल भक्तांची फराळाची सोय होणे गरजेचे होते त्यामुळे सलग तीन वर्षे झाले सदरचा उपक्रम चालू आहे यामध्ये दोन टन साबुदाणा खिचडी चे वाटप करमाळा माढा विधानसभेचे आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

             या वेळी माढा तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मा.बंडूनाना ढवळे,शिव विचार प्रतिष्ठानचे अध्यक्ष  विजय दादा खटके , तांबवे टें चे तंटामुक्ती अध्यक्ष नागाभाऊ खटके, मार्केट कमिटीचे सदस्य दिलीपराव भोसले, राष्ट्रवादीचे .रमेशकाका पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मा.नागेशबापू खटके, मार्केट कमिटी संचालक शिवाजीराव पाटील मार्केट कमिटी संचालक नागनाथ पाटील,संचालक दादासाहेब देशमुख , रामभाऊ वाघमारे, मीरा फाउंडेशनचे मयूर काळे, टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य सचिन होदाडे, विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन संतोष  खटके, यशोदीप कॅम्पुटर चे संस्थापक अध्यक्ष गोरख खटके सर, परितेचे माजी सरपंच महादेव मोरे, सापटणे गावचे पोलीस पाटील सुग्रीव पाटील,उप सरपंच अमोल ढवळे, आबा मालक ढवळे ,विकी ढवळे, संतोष जगताप, भाऊसाहेब जगताप, वेणेगावचे माजी सरपंच नागनाथ शिरसागर बेंबळे ग्रा.प सदस्य डॉ भिमराव पवार . अल्पवधीत भरारी घेतलेली उद्योजक  दादा कोल्हे,मा.काका कोल्हे हे उपस्थित होते. 

            तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष गणेश व्यवहारे, सचिव सचिन पवार योगेश पराडे हॉटेल शिव शंकर चे मालक बाळासाहेब चव्हाण बाळासाहेब खटके कैलास माने सुजित खटके शंकर  व्यवहारे नामदेव व्यवहारे शंकर ढगे कोळेकर साहेब यांनी परिश्रम घेतले.

Reactions

Post a Comment

0 Comments