माढ्यात सह्याद्री बहुउदेदशीय संस्थेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त महिलांना विठ्ठल रुक्मिणी च्या २०० मुर्त्याचे मोफत वाटप
.jpg)
माढा (कटूसत्य वृत्त): माढ्यात सह्याद्री बहुउदेदशीय संस्थेच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने महिलांना विठ्ठल रुक्मिणी मुर्तीचे मोफत वाटप करण्यात आले.
माढ्यातील कसबा पेठेत असलेल्या विठ्ठल मंदीराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला असुन माढ्यातील मंदीर व मुर्ती प्रतिपंढरपुर मानले जाते.माढ्याचे विठ्लाचे महत्व आधोरेखित करण्यासाठी तसेच विठ्ठल रुक्मिणीची मुर्ती कुटूंबात दर्शनासाठी असायला हवी या उद्देशाने महिलांना मोफत २०० मुर्त्याचे वाटप केल्याचे संस्थेचे अध्यक्ष दत्ताजी शिंदेनी सांगितले. यावेळी संस्थेच्या शारदा शिंदे, संदीप शिंदे,जयदीप शिंदे,धनश्री शिंदे,भाग्यश्री शिंदे,संतोष माने,विराज भराटे,सिराज तांबोळी आदी उपस्थित होते.संस्थेने मुर्ती वाटप उपक्रमाचे समाजातुन कौतुक झाले.
0 Comments