मुस्लिम समाजाच्या वतीने आषाढी एकादशी व मोहरम निमित्त सरबत वाटप
टेंभुर्णी (कटुसत्य वृत्त): आषाढी एकादशी तसेच मोहरम एकाच दिवशी असल्याने टेंभुर्णीतील मुस्लिम बांधव सुन्नी जमातच्या वतीने मोहरम व आषाढी एकादशी निमित्त हिंदू-मुस्लिम बांधवांसाठी सरबत वाटप करण्यात आले.
यावेळी टेंभुर्णी मध्ये हिंदू मुस्लिम एकोपा चे दर्शन दिसून आले. यावेळी टेंभुर्णीतील विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी सरबतचा आस्वाद घेतला तसेच टेंभुर्णीतील मुस्लिम बांधवांनी राबविलेल्या सामाजिक कार्यास नागरिकांनी व विठ्ठल भक्तांनी ही सरबत चा आस्वाद घेतला.
यावेळी प्रमुख पाहुणे सरपंच प्रतिनिधी योगेश बाबाराजे बोबडे, माजी सरपंच प्रमोद कुटे, तिसऱ्या आघाडीचे नेते सुरज भैय्या देशमुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष औदुंबर भाऊ महाडिक देशमुख, सापटण्याचे माजी उप सरपंच दत्तात्रय ढवळे पाटील, टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी राम पवार, वैभव भैय्या महाडिक, गौतम कांबळे,रांजणी चे सरपंच गणेश पाटील, युवा सेनेचे टेंभुर्णी शहर अध्यक्ष किशोर देशमुख, अटकेपार झेंडा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद महाडिक देशमुख,आझाद युवा फाउंडेशनचे अध्यक्ष अजिज शेख,असिफ रास्तापुरे,रहिम तांबोळी रावसाहेब, आफताब तांबोळी, गोविंद वृध्द आश्रम चे संस्थापक दशरथ बुवा महाडिक, समीर जहागिरदार, इम्तियाज सय्यद, डॉ.शहाजहान काझी, मदनी तांबोळी,राजू तांबोळी, भैय्या शेख,अस्लम शेख, असिफ शेख,असिफ काझी, आमिर काझी, इम्रान बागवान,शहाजमान जहागिरदार, आय्युब पटेल,शाकिर पटेल,कुदरत काझी, अजित जहागिरदार, संदेश जाधव, फैय्याज आतार,अफरोज मौलाना, करीम देशमुख, इक्बाल पठाण, मुन्ना माळी,नितीन कांबळे,उमेश मडके, निलेश मुसळे,अनिल जगताप, इरफान हिरापुरे,संजय जगताप सोनू भाई, संतोष सोनवणे सादिक तांबोळी, बाबा मुलाणी, वसीम सय्यद तसेच सर्व पत्रकार बंधू उपस्थित होते.
0 Comments