पिंपरी दुमाला शाळेची यशस्वी वाटचाल यज्ञेश सोनवणे राज्यात सहावा
अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेचे रहिमतपूर येथे बक्षीस वितरण!
शिरूर (कटूसत्य वृत्त ):- पिंपरी दुमाला ता.शिरूर येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिलीचा विद्यार्थी कु.यज्ञेश शंकर सोनवणे याने भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्यात सहावा क्रमांक प्राप्त केला आहे. रहिमतपूर जि.सातारा येथे झालेल्या गुणगौरव सोहळ्यामध्ये सातारा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.ज्ञानदेव म्हस्के यांचे हस्ते यज्ञेश सोनवणे यास गौरविण्यात आले.
शालेय विद्यार्थ्यांमधील बुद्धिमत्ता विकसित होण्यासाठी विद्यार्थी विकास फाउंडेशन च्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरामध्ये ही शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. राज्यभरातून हजारो विद्यार्थी या परीक्षेला बसतात. त्यामधून सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येतो. प्रतिकूल परिस्थितीशी झगडत जिल्हाधिकारी पदावर पोहोचलेले ओंकार गुंडगे यांनी यावेळी प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी मार्गदर्शक शिक्षक राहुल चातुर, कांताराम शिंदे, शंकर सोनवणे, सोपान सोनवणे, पुणे जिल्हा परीक्षा प्रमुख महेश वेदपाठक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments