स्व.प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या जयंती निमित्त 276 रक्तदात्यांनी केले रक्तदान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 2, 2024

स्व.प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या जयंती निमित्त 276 रक्तदात्यांनी केले रक्तदान

 स्व.प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या जयंती निमित्त 276 रक्तदात्यांनी केले रक्तदान


अकलूज (कटूसत्य वृत्त):- लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना, ग्रामपंचायत गिरझणी व सर्व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने व महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे मार्गदर्शक डॉ.धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील व सौ.उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गिरझणी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 276 रक्तदाते यांनी, रक्तदान करून लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सर्व ग्रामस्थ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जनसेवा संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष सतीश पालकर, सरपंच गंगुबाई साठे, रणजित देशमुख ,वकील भारत क्षीरसागर, नवनाथ साठे,हरी माने, पोलिस पाटील महेश गिरमे,मयूर माने, सचिन गायकवाड ,रमेश साठे, शामराव पालकर,सागर देशमुख, पांडुरंग माने, रामदास माने, हंबीरराव पवार, कैलास जाधव, मारुती जाधव ,चंद्रकांत रोमन, सुनील माने,मुबारक कोरबू, नेताजी काळकुठे, महादेव साठे, उमेश साठे, दत्तात्रय खुडे, राजकुमार खुडे, रवी यादव, उपस्थित होते .रक्त संकलन करण्यासाठी सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील ब्लड बँक अकलूज,  डॉ. अजित गांधी,तुषार साबळे, अनिल लोखंडे सर्व स्टाफ व अक्षय ब्लड बँक सोलापूर चेअरमन संजयकुमार  शिंदे , अजय रुपनवर, पद्मजा मोरे व सर्व स्टाफ   यांचे सहकार्य लाभले .  ग्रामपंचायत  सर्व सदस्य, शिक्षक वर्ग, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका ,आरोग्य विभाग गिरझणी व  सर्व ग्रामस्थ यांचे बहुमोलाचे सहकार्य लाभले.

गिरझणी येथील रक्तदान शिबिरास 47 महिलांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.यावेळी महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना गिरझणी यांच्यावतीने जिल्हा परिषद शाळा गिरझणी येथील मुलांना  शालेय साहित्य वाटप, खाऊ वाटप तसेच अंगणवाडी मुलांना खाऊ वाटप, शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages