अकलूज बस स्थानकाचा स्वच्छ व सुंदर बस स्थानक म्हणून प्रथम क्रमांक
अकलूज (कटूसत्य वृत्त):- हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियानामध्ये, राप अकलूज बसस्थानकाचा, महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे प्रदेशात ब वर्ग बस स्थानकामध्ये प्रथम क्रमांक आला असल्याची माहिती,आगार प्रमुख प्रमोद शिंदे यांनी दिली.
दैनिक कटू सत्यशी संवाद साधताना आगार प्रमुख प्रमोद शिंदे पुढे म्हणाले की, एप्रिल २०२३ पासून सुरु असलेले अभियान हे एप्रिल २०२४ पर्यंत सुरू होते. सदर अभियान कालावधी मध्ये एस टी चे इतर विभागाचे अधिकारी यांनी बस स्थानकाला चार वेळा भेट देऊन, स्थानकावरील सुशोभिकरणानुसार गुण देऊन, अंतिम निवड ही चारही फेऱ्यांच्या प्राप्त गुणांच्या सरासरी गुनानुसार करण्यात आली. त्यामध्ये पुणे प्रदेशातील अकलूज बस स्थानकास ब वर्ग स्थानकामध्ये एकूण ८५ गुण मिळाले व अकलूज बस स्थानकाचा प्रथम क्रमांक आला. सदर अभियानाचा उद्देश हा लोक सहभागातून सुशोभीकरण असा होता. त्या अनुषंगाने अकलूज शहरातील अनेक व्यापारी वर्गाने या अभियानात अतिशय उत्साहाने सहभाग नोंदवून, बस स्थानकास प्रथम क्रमांक मिळवून देण्यास मोलाचा हातभार लावला असल्याचे प्रमोद शिंदे म्हणाले.
.png)
No comments:
Post a Comment