EVM मशीन मध्ये घोटाळा झाला नसेल का? तब्बल 140 लोकसभा जागांवर मतांची बेरीज जुळेना...!
मुंबई (कटूसत्य वृत्त):-काही दिवसांपूर्वी देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. पण आता या निवडणुका पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. कारण तब्बल 140 लोकसभा जागांवर मतांची बेरीज जुळत नाही.याबाबत 'द वायर' या माध्यमाने महत्त्वाची माहिती दिली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत, ईव्हीएममध्ये टाकलेल्या मतांच्या आणि ईव्हीएममध्ये मोजलेल्या मतांच्या डेटामध्ये आढळलेल्या तफावतींबद्दल माहिती देण्यात आली. तर पाच वर्षांनंतर, असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने 2019 मध्ये दाखल केलेल्या याचिकेच्या आधारे, या प्रकरणाची सुप्रीम कोर्टात 2024 मध्ये सुनावणी पार पडली.
सुनावणीदरम्यान, निवडणूक आयोगाने 2019 च्या निवडणुकीदरम्यान अनेक संसदीय मतदारसंघांमध्ये आढळलेल्या विसंगतींचे सर्व दावे फेटाळले ऑन याचिकाकर्ते आणि प्रसारमाध्यमांनी निवडणूक आयोगाच्या ॲपवर प्रकाशित झालेल्या अंदाजे मतांच्या डेटाचा विचार करण्यात आला.
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीत जवळपास सर्वच लोकसभा मतदारसंघात तफावत दिसत असून 543 संसदीय मतदारसंघातील निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवर बारकाईने नजर टाकायची झाले तर असे दिसून येते की, केरळमधील दमण आणि दीव, लक्षद्वीप आणि अटिंगल यासारख्या काही संसदीय मतदारसंघांना वगळून, EVM मतांची संख्या ईव्हीएममध्ये टाकलेल्या मतांपेक्षा जास्त आहे.तसेच 140 पेक्षा जास्त लोकसभा मतदारसंघात ईव्हीएममध्ये मोजण्यात आलेल्या मतांची संख्या ईव्हीएममध्ये पडलेल्या मतांपेक्षा जास्त होती आणि येथे 3,811 मतांचा फरक आहे.राजकीय पक्ष आणि नागरी समाजाच्या सदस्यांच्या मोठ्या निषेधानंतर निवडणूक आयोगाने निवडणुकीत टाकलेल्या ईव्हीएम मतांची संपूर्ण संख्या जारी केली होती. निवडणुकीच्या पहिल्या पाच टप्प्यांसाठी, निवडणूक आयोगाने फक्त एका मतदारसंघातील मतांची टक्केवारी जाहीर केली.
इतकेच नाही तर 25 मे रोजी, निवडणूक आयोगाने पहिल्या पाच टप्प्यात ईव्हीएमद्वारे पडलेल्या मतांची आकडेवारी जाहीर करत पडलेल्या मतांच्या संख्येत कोणताही बदल शक्य नाही, असे म्हटले होते.काही दिवसांपूर्वी X (पूर्वीचे ट्विटर) वर मतमोजणी झालेल्या मतांची संख्या कमी झाल्याची चर्चा सुरू झाली होती त्यावेळी उत्तर प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले की आयोगाच्या आकडेवारीवरून मतमोजणी केलेल्या संख्येत घट दिसून येऊ शकते. काही मतदान केंद्रांवर टाकलेल्या मतांची आयोगाने जारी केलेल्या विद्यमान प्रोटोकॉल जे विविध मॅन्युअल आणि हँडबुकमध्ये देण्यात आले आहेत त्यानुसार मोजण्यात येत नाही.
जाणून घ्या संसदीय मतदारसंघातील मतांमधील फरक
करीमगंज (आसाम) मध्ये 1,140,349 मतांची मोजणी करण्यात आली. येथे 1,136,538 मतदान झाले तर या ठिकाणी 3,811 मतांचा फरक पडला.
ओंगोल (आंध्र प्रदेश) 1,401,174 मतांची मोजणी करण्यात आली. येथे 1,399,707 मतदान झाले तर या ठिकाणी 1,467 मतांचा फरक पडला.
मंडला (मध्य प्रदेश) 1,531,950 मतांची मोजणी करण्यात आली. येथे 1,530,861 मतदान झाले तर या ठिकाणी 1,089 मतांचा फरक पडला.
तिरुवल्लूर (तामिळनाडू) 1,413,947 मतांची मोजणी करण्यात आली. येथे 1,430,738 मतदान झाले तर या ठिकाणी −16,791 मतांचा फरक पडला.
कोक्राझार (आसाम) 1,229,546 मतांची मोजणी करण्यात आली. येथे 1,240,306 मतदान झाले तर या ठिकाणी −10,760 मतांचा फरक पडला.
ढेंकनाल (ओडिशा) 1,184,033 मतांची मोजणी करण्यात आली. येथे 1,193,460 मतदान झाले तर या ठिकाणी −9,427 मतांचा फरक पडला.
मुंबई उत्तर-पश्चिम, महाराष्ट्रात, 9,51,580 EVM मते पडली, परंतु 9,51,582 EVM मते मोजली म्हणजे दोन अतिरिक्त मते मोजली. शिवसेनेचे रवींद्र दत्ताराम वायकर यांनी सर्वात कमी 48 मतांनी विजय मिळवला. ठाकरे गटाचे उमेदवार अमोल गजानन यांचा पराभव केला.
जयपूर ग्रामीण, राजस्थानमध्ये 12,38,818 EVM मते पडली, पण या ठिकाणी 12,37,966 EVM मतांची मोजणी झाली, म्हणजेच 852 मतांची मोजणी झाली नाही. भाजपचे राव राजेंद्र सिंह यांनी ही जागा 1,615 मतांनी जिंकली आहे.
तसेच फारुखाबाद, उत्तर प्रदेशमध्ये 10,32,244 EVM मते टाकली परंतु 10,31,784 EVM मतांची मोजणी झाली, म्हणजेच 460 मतांची मोजणी झालेलीच नाही. येथे भाजपचे मुकेश राजपूत 2,678 मतांनी विजयी झाले.
कांकेर, छत्तीसगडमध्ये 12,61,103 EVM मते पडली पण याठिकाणी 12,60,153 EVM मतांची मोजणी झाली, म्हणजेच 950 मतांची मोजणी झाली नाही. ही जागा भाजपचे भोजराज नाग यांनी 1,884 मतांनी जिंकली आहे.
0 Comments