Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रणितीला मोहोळ ने दिलेले मताधिक्य अडचणीच्या काळातले-माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे

प्रणितीला मोहोळ ने दिलेले मताधिक्य अडचणीच्या काळातले

-माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे 

सोलापूर(कटूसत्य वृत्त):-सोलापूर लोकसभेच्या विजयी उमेदवार प्रणितीला मोहोळ ने दिलेले मताधिक्य अडचणीच्या काळातले आहे. त्यामुळे ही आठवण कधीही विसरू शकणार नाही असे सांगत प्रणिती माझ्यापेक्षा दुप्पट काम करणारी आहे. ती निश्चित एक वेगळ्या प्रकारची भूमिका घेऊन लोकसभेत काम करेल, असा विश्वास व्यक्त करत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे मतदारसंघातील मतदारांचे आभार मानले.

लोकसभेच्या निवडणुकीत विजयानंतर विजयी उमेदवार प्रणिती शिंदे यांचा मोहोळ येथे विधानसभा मतदार संघातील मतदारांचा कृतज्ञता मेळावा झाला. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे बोलत होते. व्यासपीठावर नूतन खासदार प्रणिती शिंदे, सुभाष पाटील, सुरेश शिवपूजे, शिवसेना ठाकरे गटाचे दीपक गायकवाड, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संजय क्षीरसागर, सोलापूरचे माजी नगरसेवक चेतन नरूटे, बाळासाहेब गायकवाड, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सीमाताई पाटील, काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शाहीन शेख, तालुकाध्यक्ष सुलेमान तांबोळी, ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख अशोक भोसले, शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष विनय पाटील, प्रकाश कस्तुरे, राजेश पवार, अरुण पाटील, नगरसेवक सत्यवान देशमुख, महादेव गोडसे, महेश देशमुख, किशोर पवार, राजशेखर पाटील, अॅड. पवन गायकवाड, भीमराव वसेकर, संतोष शिंदे, संग्राम चव्हाण, सुरेश हावळे, बिलाल शेख, रामभाऊ खांडेकर, दत्तात्रेय सावंत, आरिफ पठाण, नितीन जरग, नामदेव केवळे, लक्ष्मण भालेराव, भय्या गायकवाड, मंगेश पांढरे, आबा कांबळे आदी उपस्थित होते. नूतन खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, मोहोळ विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी न भूतो न भविष्य असा विश्वास टाकला. नेते एकीकडे आणि जनता एकीकडे अशा परिस्थितीत ६३ हजारांचे मताधिक्य मिळेल असे वाटलेच नव्हते. लोकांची ताकद काय असते हे मोहोळच्या जनतेने दाखवून दिले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments