मुसळधार पावसामुळे कष्टकरी कामगाराचे घर उघड्यावर...
"श्री" प्रतिष्ठानने दाखविलं दातृत्व... घराच्या पुनर्बांधणीसाठी घेतला पुढाकार
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-शहरात सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे लाईन्स परिसरातील कोनापुरे चाळ येथील नरसिंग म्हेत्रे या कष्टकरी कामगारांचे घराचे भिंत कोसळली. यामध्ये संपूर्ण घराचे मोठे नुकसान झाले. संपूर्ण घर उघड्यावर आले नशिबाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही सदरची घटनेची माहिती येथील हिंदूश्री श्रीकांत गट्टू यांनी नागेश पासकंठी यांच्या माध्यमातून झालेल्या या घटनेच्या बाबतीमध्ये भाजपाचे युवा नेते तथा श्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीनिवास संगा यांना संपर्क साधून माहिती दिली या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री प्रतिष्ठानचे श्रीनिवास संगा, प्रतिष्ठानचे सल्लागार अनिल रोहिटे, नागेश पासकंठी, श्रीनिवास चिंतनपल्ली यांनी भर मुसळधार पावसात कोनापुरे चाळ येथील म्हेत्रे यांच्या घराची केली. मुसळधार पावसामुळे म्हेत्रे यांच्या घराच्या पुनर्बांधणीसाठी श्रीनिवास संगा यांनी दातृत्व दाखवत संपूर्ण घराचा नव्याने बांधणी करून देण्याची जबाबदारी स्वीकारली त्यानुसार श्री प्रतिष्ठानच्या वतीने त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी नरसिंग म्हेत्रे यांच्या घराच्या पुनर्बांधणीसाठी पत्रे, विटा, सिमेंट, वाळू, वाशे हे सर्व साहित्य म्हेत्रे यांच्या कडे सुपूर्द केले. दरम्यान श्री प्रतिष्ठानने आमचा उघड्यावर आलेला संसार आणि घर पुनश्च बांधणी करून देण्यामध्ये त्यांनी मोठा दातृत्व दाखवला त्यानिमित्त नरसिंग म्हेत्रे आणि हिंदूश्री श्रीकांत गट्टू यांनी श्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि भाजपा युवा नेते श्रीनिवास संगा यांचे त्यांनी आभार मानले. आमच्या स्वप्नातील घरात साठी संगा यांनी जी मदतीची हात दिली आजन्म आणि त्यांच्या ऋणात राहू असेही यावेळी म्हेत्रे म्हणाले. श्री प्रतिष्ठानचे संस्थापक तथा भाजपचे युवा नेते श्रीनिवास संगा यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या कष्टकरी कामगाराचा घर आपण नव्याने पुनर्बांधणी करू याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली त्यांच्या सूचनेनुसार आज आम्ही या कष्टकरी कामगाराच्या घराच्या बांधणीसाठी लागणारे सर्व साहित्य नरसिंग म्हेत्रे यांच्याकडे सुपूर्द केले असल्याचे यावेळी नागेश पासकंठी यांनी सांगितले. यावेळी श्री प्रतिष्ठानचे सल्लागार अनिल रोहिटे यांचे मोलाचे मदत लाभले.
0 Comments