मोहोळ तालुक्यातील भटक्या विमुक्त जातीतील लोकांचे
विविध महसुली दाखले तयार
सावळेश्वर(कटूसत्य वृत्त):-भटक्या विमुक्ती जाती व जमाती संघटना यांच्या संयुक्त विधमनाने आणि भटक्याचे आराध्य दैवत रेणकेराष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष बाळकृष्ण रेणके अण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा संघटक सिद्राम (नाना)पवार यांच्या अधिपत्याखाली मोहोळ तालुक्यातील भटक्या विमुक्त जातीतील लोकांचे विविध महसुली दाखले तयार करणे या महसुल विभागाकडून आयोजित केलेल्या कँप द्वारे मौजे सावळेश्वर येथील १२ शिधापत्रिके (रेशनकार्ड) आणि मौजे चिंचोलीकाटी गावातील २४ जातीचे दाखल्यांचे वाटप आज दिनांक १२/०६/२०२४ रोजी सिद्राम (नाना) पवार यांच्या हस्ते पार पडले. तसेच उर्वरित राहिलेल्या महसुली दाखले ताबडतोब मिळण्याकरिता प्रांताधिकारी यांच्याकडे विनंती करून रेनके अण्णा यांच्या मार्गदर्शनाच्या खाली राहिलेले काम पूर्ण करू सदर कार्यक्रमावेळी मौजे सावळेश्वर येतील मिथुन पवार , सचिन विटकर , रियाज शेख , संजू धोत्रे , दीपक आभिमान पवार उपस्थित होते .तर मौजे चिंचोली काटी येथील रामलिंग धोत्रे , दीपक धोत्रे , महेश धोत्रे , अनिल पवार ई. उपस्थित होते . शिधापत्र व जातीचे दाखले वाटून व्यवस्थित कार्यक्रम पार पडला आहे .
0 Comments