मंगळवेढा तालुका प्रहारचा सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण तालुक्यात आत्तापर्यंत चा सर्वात जास्त 106 रक्तदानाचा उच्चांक..,
मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):-संपूर्ण महाराष्ट्रभर 31 मे ते 26 जुलै या कालावधीत महापुरुषांना अभिवादन देण्यासाठी व महाराष्ट्रातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी प्रहार ने संपूर्ण राज्यभर रक्ताची मोहीम हाती घेतली आहे.
प्रहारचे सर्वेसर्वा वंदनीय नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत सोलापूर जिल्ह्यातून आज, दि ,१२/०६/२०२४,महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी मंगळवेढा तालुक्यातून प्रहारच्या माध्यमातून जवळजवळ १०६, रक्तदात्यांनी रक्तदान करून या रक्तदानाच्या मोहिमेतला सोलापूर जिल्ह्यातून ग्रामीण तालुक्यात रक्तदात्यांच्या आकड्याचा उच्चांक गाठला, बच्चुभाऊंच्या आव्हानाला प्रतिसाद देत सोलापूर जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्याने यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला असून वेगवेगळ्या तारखांना पुढील आठवडाभरात,प्रत्येक तालुक्यात रक्तदान शिबिर मोठ्या ताकतीने राबवून इतर राजकारण्यांच्या मतदानापुरताच लोकांचा वापर करून आपल्या फायद्यासाठी हव्या त्या गोष्टी करणाऱ्या या राजकारण्यांच्या नालायक वृत्तीला छेद देत एक अनोखी संकल्पना लोकनेते बच्चुभाऊ कडू यांनी राबवली,आणि महाराष्ट्रात रक्तचा तुटवडा भरून काढण्यासाठी स्वतः रक्तदान करून या मोहिमेत सहभाग नोंदवला प्रहार संघटनेचे सोलापूर,जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांनी उत्तर सोलापूर मधून स्वतःच्या वाढदिवसा दिवशी या मोहिमेत रक्तदान करून सोलापूर जिल्ह्यातून या अभियानाला सुरुवात केली होती,त्याच अनुषंगाने आज मंगळवेढा तालुक्यात जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांच्या मार्गदर्शनात प्रहार जनशक्ती पक्ष अपंग क्रांती आंदोलन,शेतकरी संघटनेच्या वतीने रक्तदानाचे आयोजन करण्यात आले होते यात प्रहार चे जिल्हा सरचिटणीस श्रीपाद पाटील प्रहार अपंग क्रांती आंदोलन तालुका अध्यक्ष समाधान हेंबाडे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धया माळी प्रहार शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष राकेश पाटील अपंग क्रांती संपर्कप्रमुख शकील खाटीक,महिला शहराध्यक्ष सविताताई सुरवसे, अरुणा घाडगे,यांनी स्वतः रक्तदान करून यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिकांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला.
0 Comments