वरकुटे गावच्या सरपंच पदी सौ तेजश्री प्रशांत बचुटे यांची
बिनविरोध निवड.....
मोहोळ(कटूसत्यवृत्त):-वरकुटे गावच्या सरपंच सौ.राजश्री हरिदास बंडगर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदी आज सौ तेजश्री प्रशांत बचुटे यांची बिनविरोध निवड झाली. लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील यांचे कट्टर समर्थक व मोहोळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रशांत बचुटे यांच्या सुविद्य पत्नी सौ तेजश्री बचुटे यांची निवड एकमताने करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून टाकळी सिकंदर मंडलचे मंडलाधिकारी वागज,सहाय्यक म्हणून तलाठी जमादार व ग्रामसेवक सत्यवान माने यांनी यावेळी कामकाज पाहिले.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव सोनवणे,निवृत्त प्राचार्य पांडुरंग सोलंकर,हरिदास बंडगर गुरुजी वरकुटे सोसायटीचे चेअरमन सुधीर बसाटे माजी चेअरमन बळीराम भुसे उपसरपंच नितीन रोकडे माजी सरपंच दत्तात्रय बचुटे विजयकुमार बसाटे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाबासाहेब बचुटे तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील हनुमंत पाटील प्रदीप भुसे लिंगेश्वर शिंदे सुहास बसाटे दिगंबर बचुटे सुनील बचुटे सचिन बसाटे आदी उपस्थित होते.
माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव सोनवणे निवृत्त प्राचार्य पांडुरंग सोलंकर हरिदास बंडगर गुरुजी उपसभापती प्रशांत बचुटे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले निवडीनंतर माजी आमदार राजनजी पाटील आमदार यशवंत माने लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे उद्योजक रामदास भाई चवरे जिल्हा बँकेचे माजी संचालक भारत सुतकर आदींनी अभिनंदन केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन हरिदास बंडगर गुरुजी यांनी केले तर आभार उपसरपंच नितीन रोकडे यांनी मांडले.
0 Comments