अध्यक्ष सुहास साळुंखे व उपाध्यक्षपदी हेमंत जाधव यांची निवड.... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 27, 2024

अध्यक्ष सुहास साळुंखे व उपाध्यक्षपदी हेमंत जाधव यांची निवड....

 अध्यक्ष सुहास साळुंखे व उपाध्यक्षपदी हेमंत जाधव यांची निवड



सोलापूर(कटूसत्य वृत्त):- शासकीय मैदान नेहरूनगर सोलापूर येथील न्यू जॉगर्स फाउंडेशनची 2024-25 वार्षिक  कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली. क्रीडा,सांस्कृतिक, सामाजिक न्याय व पर्यावरणपूरक उपक्रम राबवून जनजागृती करणे.

हे उद्दिष्ट समोर ठेवून राजश्री शाहू महाराज जयंती दिनानिमित्त कार्यकारिणी तयार करण्यात आली आहे. पुढील प्रमाणे अध्यक्ष सुहास साळुंखे,उपाध्यक्ष हेमंत जाधव, सचिव सतीश घोडके, कार्याध्यक्ष उन्मेश कमलापुरे,खजिनदार दिलीप कदम आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.

नवनियुक्त झालेल्या कार्यकारणीचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अधिकारी अंबादास यादव, उद्योजक विरेश नसले,
सहाय्यक निबंधक दत्तात्रय मोरे, जलसिंचन विभागाचे आनंद कटाप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे काशिनाथ औरसंग,राजेंद्र जंगम, न्यू जॉगर्स फाउंडेशनचे माजी अध्यक्ष दीपक नलावडे, दीप टीचिंग क्लासचे प्राध्यापक मनोज जाखेटिया,जनसंपर्क अधिकारी प्रकाश पाटील, रॉबिन हूड आर्मीचे पंकज वाघमोडे, सुजित शिंदे, अमरीश चिनोरकर, सोलापूर रेल्वे विभागाचे आनंद गायकवाड आणि फाउंडेशनच्या सदस्यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

नवनियुक्त कार्यकारिणी च्या पदाधिकाऱ्यांनी वर्षभर विविध विधायक व विकास कामे करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. यावेळी न्यू जॉगर फाउंडेशनचे माजी अध्यक्ष श्री राम साठे, नींगराज विंचुरे, संतोष कदम, जेष्ठ पत्रकार प्रशांत जोशी, एडवोकेट मनीष गडदे आणि माजी नगरसेवक विजय शाबादे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages